एक्स्प्लोर

Shishupal Patle: मोठी बातमी: प्रफुल पटेलांना पराभवाची धूळ चारणारा भाजपचा 'हा' तगडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Politics: भाजपला भंडाऱ्यात मोठा धक्का, विधासभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची ताकद वाढली. शिशुपाल पटले यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.

भंडारा: काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देणारे भंडाऱ्यातील भाजपचे माजी नेते शिशुपाल पटले यांनी अखेर आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा मार्ग निश्चित केला आहे. शिशुपाल पटले हे 15 किंवा 16 ऑगस्टला मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. शिशुपाल पटले (Shishupal Patle) यांच्या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेस (Congress) पक्षाची ताकद आणखीनच वाढणार आहे. शिशुपाल पटले हे भंडारा, गोंदियातील भाजपच्या ताकदवान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षातील नियोजित पक्षप्रवेश भाजपसाठी (BJP) मोठा झटका मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला होता. विदर्भात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने 10 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता.

शिशुपाल पटले यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. भाजपच्या नेत्यांनी पटले यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिशुपाल पटले हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांचा हा निर्णय भंडारा जिल्ह्यात भाजपसाठी फार मोठा झटका मानला जात आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पोवार समाज मोठ्या प्रमाणात आहे.शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटलेंनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.

शिशुपाल पटले यांनी भाजपला सोडचिठ्ठी का दिली?

तुमसर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, बेरोजगार, बावनथडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 12 गावांना सिंचन व्यवस्था आदी प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणावरून पटले यांनी 25 जुलै रोजी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. महागाई, बेरोजगारी, वीजेचे अवास्तव वाढलेले दर, यामुळं सर्वसामान्य नागरिकांना जगणं कठीण झालं आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि वारंवार नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्याची महाराष्ट्र सरकारची घोषणा हवेतच आहे. उन्हाळ्यात रब्बी पिकाची जे नुकसान झालं त्याची अद्याप भरपाई मिळालेली नाही, पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मात्र, राज्य सरकारकडून सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत असल्याचे सांगत शिशुपाल पटले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता.

भाजपला घरचा आहेर

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिशुपाल पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यांनी म्हटले होते की, जनसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. पक्षामध्ये सध्या जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. भाजपमध्ये लोकशाहीचा अस्त झाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा आता राहिली नाही. खऱ्या कार्यकर्त्यांचा भाजपला विसर पडू लागला आहे. कर्मठ सामान्य कार्यकर्त्याची किंमत पक्षाला नाही, असे शिशुपाल पटले यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा

'शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी'; माजी खासदाराचा भाजपला घरचा आहेर

महत्त्वाच्या बातम्या

बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Rohini Khadase On UPI Charge: ''डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
'डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
Is MDR On Credit Cards Linked To UPI: UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Embed widget