भंडाऱ्यातील मॉइल्स मॅग्नीज खाणीत मोठी दुर्घटना, 2 कामगारांचा ढीगाऱ्याखाली दबून मृत्यू, आणखी काही कामगार अडकल्याची भीती
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला (Chikhla) इथं असलेल्या मॉइल्स मॅग्नीज खाणीत (Moyles manganese mine) मोठी दुर्घटना घडली आहे. दोन कामगारांचा ढीगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.
Bhandara News : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला (Chikhla) इथं असलेल्या मॉइल्स मॅग्नीज खाणीत (Moyles manganese mine) मोठी दुर्घटना घडली आहे. दोन कामगारांचा ढीगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. मॅग्नीज काढण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये आणखी काही कामगार दबून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अंडरग्राउंडमध्ये 100 मीटरच्या घडली दुर्घटना
चिखला इथं गदेघाट मधील तिसरी लेवल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. चिखला मॉइल्सची 2445 नंबरच्या फेसमध्ये घडली ही दुर्घटना घडली आहे. मॅग्नीज ब्लास्टिंगनंतर त्यातील मॅग्नीज काढण्यासाठी सकाळी सहा ते सात कामगार अंडरग्राउंड माईन्समध्ये कामासाठी गेले होते. यावेळी अंडरग्राउंडमध्ये 100 मीटरच्या आत ही दुर्घटना घडली आहे. यात एका कामगारांचा मृत्यूदेह बाहेर काढला असून एकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या:























