एक्स्प्लोर

Bhandara Crime News : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीने संपवले पतीचे आयुष्य; आरोपी पत्नीसह प्रियकराला अटक

Bhandara Crime News : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली आहे. या थरारक घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Bhandara Crime News : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पतीची गळा आवळून हत्या केली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं पतीचा मृतदेह जंगलातील नाल्यात फेकून दिला. ही खळबळजनक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडगी जंगलात उघडकीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, या प्रकरणात पतीपासून विभक्त राहणारी पत्नी आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची बाब समोर आली. या थरारक घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमसंबंधातून पतीची हत्या 

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांवरही गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आदेश राऊत (38) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रियकर विक्की करकाडे (38) आणि पत्नी ज्योती राऊत (35) असे या दोन आरोपीचे नाव आहे.

पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

या घटनेतील मृतपती आदेश राऊत आपल्या पत्नीसह राहत होता. याच गावात प्रियकर विक्की करकाडे हा देखील राहत होता. मृत आदेश राऊत यांची पत्नी ज्योती राऊत आणि प्रियकर विक्की करकाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. कालांतराने ज्योती राऊत या आपल्या पतीपासून विभक्त राहून प्रियकर विक्की करकाडे सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याबाबत पतीला कुणकुण लागेल आणि आपल्या प्रेमसंबंध उघडकीस येईल ही भीती पत्नी आणि प्रियकरला होती.

या भीतीपोटी या दोघांनी प्रेमसंबंधात अडसर ठरू पाहणाऱ्या पतीची हत्या करण्याची योजना आखली. याच मनसुब्यात असलेल्या  प्रियकर आणि पत्नीने संधी मिळताच आदेश राऊत यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. विशेष बाब म्हणजे हत्या केल्या नंतर या दोघांनी मिळून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. कुणाला आपल्या कृत्याची खबर लागू नये यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं पतीचा मृतदेह जंगलातील नाल्यात फेकून दिला. मात्र याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने  तपास करून प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांवरही गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Raosaheb Danve & Babanrao Lonikar : 40 वर्ष एकाच पक्षात, पण 12 वर्षे अबोला,  दानवे-लोणीकर एकत्र
Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Embed widget