एक्स्प्लोर

Manoj Jarange : सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार; पहिल्याच दिवशी मनोज जरांगेंचा एल्गार

Manoj Jarange : सरकारने जागं व्हावं आणि मराठा समाजाला त्याच्या हक्काचे ओबीसीमधून आरक्षण द्यावे, असेही जरांगे म्हणाले आहे.

बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहे. आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथून रवाना झालेले जरांगे आज धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्याचा दौरा करणार आहे. पण, याचवेळी त्यांचे जागोजागी जोरदार स्वागत होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, बीडच्या (Beed) पाली गावात देखील त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. तर, यावेळी बोलतांना जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. "आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 

दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "आरक्षणाला विरोध करणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. त्यांनी काहीही म्हटले तरी आम्हाला काहीच देणघेण नाही. त्यांनी सभा घेतल्या तरीही आम्हाला काहीच अडचण नाही. पण आरक्षण घेपर्यंत मराठा समाज एकत्र राहणार आणि आरक्षण मिळवणार. तर, सरकारने जागं व्हावं आणि मराठा समाजाला त्याच्या हक्काचे ओबीसीमधून आरक्षण द्यावे. राज्यातील प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. कारण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचे," जरांगे म्हणाले आहे. 

लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र 

मी समाजाचा लेकरू असून, त्यांच्यासाठी लढत आहे. आता नोंदी मिळत असून, मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाज सगळे कामं सोडून फक्त आता आरक्षणासाठी वेळ देत आहे. तर, आम्ही देखील सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार आहोतच. यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येत आहे. ठिकठिकाणी लोकं थांबवून जे काही स्वागत करत आहेत, ती वेदना आहे मराठा समाजाची. जेसीबी लावून अंगावर फुलं टाकण्याचे मी सांगितले नाही, पण समाजाचे हे प्रेम आहे. नोंदी मिळाल्यानंतर राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता आमच्या लेकरांना न्याय मिळणार आहे. म्हणून हातातील सगळे कामं सोडून समाज आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र येत असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 

तब्बल 70 वर्षांपासून मराठा समाजाचे वाटोळं

मी या समाजाचा मुलगा आहे, त्यामुळे ते आपल्या लेकरावर प्रेम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवणार असल्याचे मी सांगितले होते. त्यानुसार आता कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या आहेत. मी काही उपकार केले नसून, मुलगा म्हणून आपल्या समाजासाठी प्रयत्न करत आहे. माझे हे कर्तव्य होते आणि तेच पार पाडत आहे. मराठा समाजाने जरी मला नेते म्हणून स्वीकारले असेल, पण मी स्वतःला कधीच नेता मानत नाही. मी फक्त सेवक आहे. नोंदी मिळाल्यापासून समाजात उत्साहाचे वातावरण असून, सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा आनंद आहे. तब्बल 70 वर्षांपासून मराठा समाजाचे वाटोळं करण्याचे काम झाले, असल्याचे देखील जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

भन्नाट ऑफर! मनोज नाव असलेल्या व्यक्तीला 'या' हॉटेलमध्ये मिळणार मोफत जेवण; मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला असाही पाठींबा

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
Beed Crime Walmik Karad: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा धक्का, पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळली
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा धक्का, पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळली

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget