एक्स्प्लोर

Walmik Karad : वाल्मिक कराडला मकोका, आक्रमक समर्थकांकडून परळी बंदची हाक; टायर पेटवल्या, बाजारपेठ बंद केली

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यावरून कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत. 

बीड : खंडणी प्ररकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका (Walmik Karad Mcoca) लावल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहरात सध्या कडकडीत बंद झाली असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यांवर टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केला. वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुळाशी हेच खंडणी प्रकरण असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

आज मकरसंक्रांत असल्याने बाजारपेठ गर्दीने सजली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांनी दिली. त्यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा, टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड सगळं बंद झालं.

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई 

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. 

या आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं होतं. आता वाल्मिक कराडलाही या कायद्याच्या अंतर्गत आणण्यात आलं आहे. 

हत्येत अजून कुणी सामील असल्यास कारवाई करावी

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू केल्यानंतर संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात अजून कुणाचा समावेश असल्याच त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने केली आहे. 

वाल्मिक कराडच्या आईचा ठिय्या

पवनचक्की खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला सोडण्यात यावं, त्याला जातीय राजकारणाचा बळी केला जातोय असा आरोप करत वाल्मिक कराडच्या आईने आणि पत्नीने परळी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. आता वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या पत्नीने निषेध व्यक्त केला आहे. 

दरम्यान, संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये वाल्मिक कराडशी संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 8PM 25 March 2025Job Majha : NMDC स्टील लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 25 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.