Beed News : बीड जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं, वादळी वाऱ्यासह गारपीट; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Beed Unseasonal Rain : शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे.
Beed Unseasonal Rain : हवामान खात्याने (Weather Forecast) तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा दिला असून, त्यानुसार शनिवारी बीडमध्ये (Beed) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे सकाळपासून सुरू झालेला पावसाने सायंकाळी चार वाजेनंतर शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह तब्बल दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. यात शेत-पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील महादेव किसन गर्जे (वय 60 वर्षे) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी मराठवाड्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील मराठवाड्यातील अनेक भागात जरबअवकाळी पाऊस झाला आहे. तर बीड जिल्ह्यात अक्षरशः ओढे नाल्यांना पाणी आले आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. सोबतच आंब्याच्या बागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात देखील अशीच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी देखील शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झालं होतं. मात्र आता उरलेसुरले पीक देखील कालच्या अवकाळी पावसामुळे हातचं गेलं आहे.
वीज पडून शेतकऱ्याचं मृत्यू!
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील महादेव किसन गर्जे नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. मात्र सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. जोरदार विजांचा कडकडाट देखील सुरू होता. दरम्यान पाऊस वाढल्याने गर्जे हे एका झाडाखाली आश्रयाला थांबले होते. पण, याचवेळी झाडावर वीज कोसळली ज्यात त्यांचा जागीच मुत्यू झाला. तर त्यांच्यासह सोबत असलेल्या दोन शेळ्या देखील मृत झाल्या आहेत. महादेव गर्जे यांच्या मृत्यू बाबत कळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
केज तालुक्याला अवकाळी चा फटका!
दरम्यान शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बीडच्या केज तालुक्यात देखील बसला आहे. केज तालुक्यातील युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, नांदूरघाट, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, विडा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. त्यामुळे आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे यांचा बैल आणि मांगवडगाव दत्तू मुळूक यांची गाय वीज पडून दगावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Maharashtra Rain: आभाळ फाटलं, काळीज तुटलं; अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचं पाणी