एक्स्प्लोर

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराशी संतोष देशमुखांचं खास नातं, पत्नीनं सांगितलं पुणे कनेक्शन

संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांचाही जबाब समोर आला आहे. यामध्ये या दोघींनीही संतोष देशमुख यांचे पुण्यााशी असलेलं खास नातं सांगितलं आहे.

Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात  (Santosh Deshmukh murder case)  गेल्या तीन महिन्यांपासून नवनवीन खुलासे होत आहेत.  या प्रकरणी चार्जशीट दाखल केले आहे. यामध्ये आरोपींसह कुटुंबियांचे साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या जबाबातून नवीन माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांचाही जबाब समोर आला आहे. यामध्ये या दोघींनीही संतोष देशमुख यांचे पुण्यााशी असलेलं खास नातं सांगितलं आहे. जबाबात आश्विनी देशमुख आणि वैभवी देशमुख नेमकं काय म्हणाल्या ते पाहुयात. 

संतोष देशमुखांचं पुण्याशी खास नात

संतोष देशमुख यांची पत्नी आणि लेकीच्या जबाबातून विविध माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हे गावातील लोकांचे दारुचे व्यसन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत होते. गावातील ज्या लोकांना दारुचे व्यसन आहे त्यांना ते पुण्याला घेऊन जात असे. आश्विनी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे पती गावातील व आजुबाजुच्या गावातील दारुचे व्यसन असलेल्या लोकांना दारु सोडवण्याकरीता पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या डोणजे येथील निळकंठेश्वर मंदिरात घेऊन जात असत. त्याठिकाणी तेथील पुजारी लोकांच्या गळ्यात पंचरंगी जाड धागा बांधत असतं. माझे पतीनेही त्याठिकाणी असा पंचरंगी जाड धागा गळ्यात घातला होता. ज्यावेळी मी माझ्या पतीचे प्रेत पाहिले त्यावेळी त्यांच्या गळ्यात पंचरंगी धागा नव्हता अशी माहिती यावेळी आश्विनी देशमुख यांनी दिली.

विष्णू चाटेनं फोनं करुन दिली धमकी

दरम्यान, जबाबात दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या एक दिवस आधी संतोष देशमुख यांनी पत्नीला आपल्याला टेन्शन आल्याचं सांगितलं होतं. विष्णू चाटेचा फोन होता. वाल्मिक कराडच्या लोकांना मी त्या दिवशी कंपनीत जाताना अडवले म्हणून विष्णु चाटेने पुन्हा फोन केला होता. तुला आमच्या आणि कंपनीच्यामध्ये पडायची काय गरज होती. आम्ही, वाल्मिक अण्णा आणि कंपनीवाले आमचं आम्ही बघून घेतलं असतं. तुला आता हे लई जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असे तो म्हणत होता. त्यामुळे मला टेन्शन आलय. असे माझ्या पतीनी मला सांगितल्याची माहिती आश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबत दिली आहे. 

आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या 

मस्साजोग गावात असलेल्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी बंद पडू नये गावात रोजगार चालू राहावा, अशी सरपंच संतोष देशमुखांची इच्छा होती. त्यामुळे आरोपी ज्यावेळी खंडणी मागायला आले आणि मस्साजोगच्या वॉचमनला मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांना मस्साजोग च्या तरुणांनी मारहाण केली आणि व्हिडिओ व्हायरल झाला. मारहाण झालेल्या तरुणांना बदला घ्यायचा म्हणून सरपंच संतोष यांचे अपहरण केले. संतोष देशमुख हे कायमच गावच्या भल्यासाठी झटत असे. पत्नी आणि लेकीच्या जबाबनुसार संतोष देशमुख हे गावातील दारुचे व्यसन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत होते. गावातील ज्या लोकांना दारुचे व्यसन आहे त्यांना ते पुण्याला घेऊन जात असत.

महत्वाच्या बातम्या:

आरोपींना फाशीच झाली पाहिजे, टोळ्या सांभाळणाऱ्यांना थांबवलं पाहिजे, बारामतीच्या मोर्चानंतर काय म्हणाले धनंजय देशमुख?

 

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget