Beed : वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी मागितली? शिवराज बांगरचा अंजली दमानियांना कॉल, म्हणाले, पैसे परत...
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडने एका जमीन प्रकरणी तीन कोटींची खंडणी मागितली होती असा आरोप शिवराज बांगर याने केला.

बीड: शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक एफआयआर अंजली दमानिया यांनी समोर आणली होता. यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्याशी फोनवर बोलून आपली बाजू मांडली आहे. त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
काय म्हटलं शिवराज बांगरने?
शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांना कॉल करून त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले की, "एका सहकाऱ्याने जमीन खरेदी केली होती. त्यावर वाल्मिक कराडने त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाल्मिक कराडने तीन कोटींची खंडणी मागितली. ही खंडणी चर्चेनंतर एक कोटी रुपये इतकी ठरली. त्यानंतर 25 लाखांची एक रक्कम मी त्यांना दिली. पण नंतर ते काम झालं नाही. त्यामुळे ती रक्कम परत मागायला गेल्यानंतर वाल्मिक कराडने त्याला नकार दिला. ते कुणाचेच पैसे परत देत नाहीत. त्यानंतर माझ्यावर त्यांनी खंडणी मागितल्याचा खोटा आरोप केला."
वाल्मिक कराडने अनेकांना अशा प्रकारे लुटलं आहे. त्याने घेतलेले पैसे तो परत कधीच देत नाही. खंडणीच्या माध्यमातून त्याने किमान एक हजार कोटी रुपयांची माया जमवल्याचा आरोप शिवराज बांगर यांनी केला.
शिवराज बांगरे माध्यमांसमोर केलेले खुलासे खालीलप्रमाणे,
माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहे त्यावर पोलिसांनी 2023 मधील एखादा फोन, सीसीटीव्ही द्यावा. माझे त्यांना चॅलेंज आहे. हा मला अडकविण्यासाठी केलेला प्रकार आहे. त्या व्यक्तीकडे मी खंडणी मागितली हे न कळणारे आहे. हा गुन्हा कसा दाखल झाला. काय पुरावे आहेत हे त्यांनी माहिती द्यावी. पण माझ्याकडे जे पुरावे आहेत ते देणार आहे. मी तुरुंगवास भोगला आहे. मला मरताना अकाला व्हिडीओ कॉलवर बघायचे होते. ते स्वप्न त्यांचे अपूर्ण राहिले आहे.
मी तेथूनच येतो ज्या ठिकाणीहून हे सर्व लोक येतात. मी गुन्हेगार आहे का? हे तुम्ही सांगा. आजही माझे जाहीर आवाहन आहे की त्यांनी भगवान गडावर यावे आणि जाहीर सांगावे की शिवराज बांगर याची काय चूक आहे. मी 2023 मध्ये मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.
एक व्यक्ती माझा छळ करत होता होता. त्यामुळे मी सहा पानी पत्र लिहून आत्महत्या करणार होतो. आता ते सगळे पुरावे समोर आणणार आहे. मला एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करत जेलमध्ये डांबण्यात आल होतं. माझ्यावर कोणतीही क्रिमिनिल केस नाही. तरी सुद्धा कारवाई झाली. माझ्यावर अन्याय होऊ नये या करता प्रयत्न झाले, पण तरी देखील कारवाई झाली. परंतु न्यायालयात ही कारवाई टिकली नाही.
मी ज्या तुरुंगात होतो तेथे माझा छळ झाला. अधिकारी असतील, कैदी असतील त्यांनी माझा छळ केला. मी माझ्या कुटुंबांच्या सुरक्षेच्या कारणामुळे घाबरलो. काही जणांना माझे पाय तोडलेले पाहायचे होते. माझ्या पत्नीला, मुलीला त्यांचे मोबाईल नंबर बदलण्याची वेळ आली.
मी सर्व प्रकरणात पुरावे देणार आहे. मी वाल्मीक बाबुराव कराड याच्याकडे खंडणी मागितल्याची तक्रार होती. त्यानुसार काही अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. मी पोलिस अधीक्षक कार्यालयात असताना, बाहेर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. राजकीय पाठबळ असल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

