Pankaja Munde : मनोज जरांगेंनी लोकसभेची भूमिका जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...
Pankaja Munde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Pankaja Munde : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज मराठा समाजाशी संवाद साधला. यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मराठा समाजातून प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवाराला अपक्ष म्हणून उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, अत्यंत साध्या पणातून उभे राहिलेले आंदोलन आणि त्यातून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत उभा राहणार नाही, असे सांगितले होते. ते त्यांनी आज पुन्हा सिद्ध केले आहे. शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार देणे न देणे हा त्यांचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नका - पंकजा मुंडे
काल मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांचा ताफा जात असताना काही मुलांनी हातामध्ये काळी झेंडे धरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये ती लहान मुले आहेत. त्यांच्याकडून अनावधानाने ते झाले असेल मात्र केवळ झेंडे दाखवले म्हणून लहान मुलांवर गुन्हे दाखल करू नका, अशी विनंती त्यांनी केली आहे.
तुमची बहीण यावेळी संसदेत जाणार - पंकजा मुंडे
दरम्यान, पंकजा मुंडे यांचे आज बीड जिल्ह्यातील परळीत परळीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी पारंपारिक बंजारा समाजाची वेशभूषा परिधान केली होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी खूप लोकांचे हाल पाहिले आहे. जेव्हा सत्ता आली तेव्ही मी सर्व काही केले.2014 ते 2019 मध्ये मी केलला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास. हा मुद्दा प्रत्येत जातीपातीची भिंत पाडून टाकणार आहे. या जिल्ह्यात राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे मला आता जिल्ह्यात जास्त फिरता येईल. तुमची बहीण यावेळी संसदेत जाणार आहे. मी शूरवीर योद्धा आहे. तुमच्यासाठी संसदेत बसून युद्ध लढेन, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा