एक्स्प्लोर

पंकजा मुंडे- देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर; मुंडेंनी यापूर्वी दोनदा टाळले होते फडणवीसांसोबतचे व्यासपीठ

Pankaja Munde : मागील वर्षभरात पंकजा मुंडे अथवा भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडमध्ये आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर जाण्याचे टाळले होते.

बीड : जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde)  या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत विमानाने नांदेडला येतील. त्यानंतर, नांदेडहून पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर पोहोचतील. गोपीनाथ गडावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर परळी शहरातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला निघतील. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

विशेष म्हणजे, मागील वर्षभरात यापूर्वी दोन वेळा देवेंद्र फडणवीस हे बीडला आले. मात्र दोन्हीवेळी पंकजा मुंडे अथवा भाजप खासदार प्रीतम मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्या नव्हत्या. मात्र, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि अजित पवार येत असताना पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमात पाहायला मिळतील. 

सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे आज बीडच्या परळीत पोहचणार आहे. परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व नेतेमंडळी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.  यावेळी, सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ होणार असून, अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण देखील होणार आहे. सोबतच, विविध शासकीय योजनांच्या जिल्ह्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना होणार थेट लाभाचे वितरण करण्यात येणार आहे. 

'या' कामांचा होणार शुभारंभ

परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी उभारणीचे भूमिपूजन, परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286 कोटी 68 लाख रुपयांच्या आराखड्याचे भूमिपूजन, परळी तालुक्यात कृषी विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या तीन शासकीय संस्था उभारणीच्या 311 कोटींच्या कामांचे भूमिपूजन, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या 61 कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन, परळी शहर बसस्थानकाच्या सुधारित कामाचे भूमिपूजन, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन, यांसह बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिरसाळ्यात उभारण्यात आलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे लोकार्पण आणि जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना विविध योजनेतील लाभाचे थेट वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Pritam Munde : सध्याचे राजकारण म्हणजे कबड्डीचा खेळ झाला आहे; प्रीतम मुंडे स्पष्टच बोलल्या

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget