एक्स्प्लोर

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसाने अतोनात नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू: धनंजय मुंडे

Beed:  मागील काही दिवसात परतीच्या पावसाने परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा ईशारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

Beed:  मागील काही दिवसात परतीच्या पावसाने परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहूनतरी पाझर फुटेल का, सरकारने अतिवृष्टीने ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा ईशारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

शासकीय यंत्रणा या पावसाने केलेल्या नुकसानीला कोणत्या निकषात पाहतात माहीत नाही, मात्र या पावसाने झालेले नुकसान अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. मागील 15 दिवसात जिल्ह्यात जवळपास दररोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. यावर शासन प्रशासन कोणतीही उपाययोजना करू शकले नाही. काल शिरूर तालुक्यात 4 जणांचा पावसाच्या कहारामुळे मृत्यू झाला. आज परळी तालुक्यात एक युवकाचा पुरात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. शासनाने याची दखल घेतल्याचे अजूनतरी दिसून आले नाही, हे दुर्दैवी असून राज्यात सरकार आहे तरी कुठे, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

मागील तीन महिन्यांच्या नुकसानीचे दोन वेगवेगळ्या मदतीचे जीआर आले, कोट्यावधी रुपयांच्या मदतीची घोषणा झाली पण त्यात बीड जिल्ह्यात नुकसान झालेच नाही, असा दावा करत सरकारने मदतीपासून वगळले. आता जे समोर दिसते आहे, ते नुकसान पाहूनतरी सरकारच्या मनाला पाझर फुटणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी सरकारला तातडीने मदतीचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.  

काल रात्रीपासून परळी मतदारसंघात ढगफुटीसदृश जोरदार पाऊस पडतो आहे. शेतीचे नुकसान पाहून तर मन सुन्न होते आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा कोलमडून पडला आहे. राज्य सरकारने काल झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत अतिवृष्टी बाधित मराठवाडा व विदर्भासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र असे झाली नाही, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.

धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यात पावसाने नुकसान केलेल्या वाघबेट, कौठळी, कौठळी तांडा, बेलंबा, इंजेगाव आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसाने अक्षरशः कहर केला असून, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. काही ठिकाणी नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानेही नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, किराणा, धान्य आदी नुकसान झाले असेल अशा कुटुंबांना तातडीने आकस्मिक निधीतून अर्थ सहाय्य देण्याच्या सूचना मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना केल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ पूर्ण करून शासनास पाठवावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
SBI ATM Rules : 1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
No UPI Day : मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report
Lady Shri Ram College Closed : लेडी श्रीराम कॉलेजमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न | Special Report ABP Majha
Maharashtra Drought : कोरड्या जमिनी, डोळ्यात पाणी, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर | Special Report ABP Majha
Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
SBI ATM Rules : 1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
No UPI Day : मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन
दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लुटले; विद्यार्थ्यांना लुटणारी टोळी जेरबंद, दोन विधिसंघर्ष बालक
दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लुटले; विद्यार्थ्यांना लुटणारी टोळी जेरबंद, दोन विधिसंघर्ष बालक
पुणे पोलिसांचा रुट मार्च, ड्रोनसह विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर; ठाणे, कोल्हापूरातही कडक बंदोबस्त
पुणे पोलिसांचा रुट मार्च, ड्रोनसह विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर; ठाणे, कोल्हापूरातही कडक बंदोबस्त
पीएम मोदी आणि अमित शाहाच कटाचे मास्टरमाईंड, 2024 लोकसभा निवडणूक बनावट, ज्ञानेश कुमारांनी देशाच्या घटनात्मक चौकटीवर हल्ला केलाय, देशद्रोही कृत्य केलंय, तातडीने राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल
पीएम मोदी आणि अमित शाहाच कटाचे मास्टरमाईंड, 2024 लोकसभा निवडणूक बनावट, ज्ञानेश कुमारांनी देशाच्या घटनात्मक चौकटीवर हल्ला केलाय, देशद्रोही कृत्य केलंय, तातडीने राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल
ZP अध्यक्षांच्या स्वीय सहायकाने दीड लाखांची लाच घेतली; तीन दिवसांची पोलीस कोठडी, ACB चा तपास सुरू
ZP अध्यक्षांच्या स्वीय सहायकाने दीड लाखांची लाच घेतली; तीन दिवसांची पोलीस कोठडी, ACB चा तपास सुरू
Embed widget