एक्स्प्लोर

मोठी बातमी! जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शाळा आज बंद; गुणरत्न सदावर्तेंचा मात्र आक्षेप

Manoj Jarange Sabha in Beed : बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवत आज शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज बीड (Beed) जिल्ह्यात इशारा सभा होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने (Education Department ) मोठा निर्णय घेतला आहे. जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता बीड शहरातील आज सर्व शाळा बंद (School Closed) असणार आहे. शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील सगळ्याच शाळांना (School) सुट्टी देण्यात आली आहे. बीड शहरालगत आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असतानाच शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कोणताही त्रास होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केले.

बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "बीड शहरातील सर्व शाळा 23 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात यावे. याबाबत दक्षता घ्यावी" असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बीड शहरात आता एकूण तीन दिवस शाळा बंद असणार आहेत. कारण शनिवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी असेल आणि सोमवारी नाताळ सण असल्याने शासकीय सुट्टी असणार आहे. 

गुणरत्न सदावर्तेंचा आदेशाला विरोध...

बीड शहरात आज मनोज जरांगे यांची सभा होणार असल्याने शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी काढले आहेत. मात्र,"राईट टू एज्युकेशन अधिकारानुसार अशाप्रकारे शाळा बंद ठेवणे गैर आहे. त्यामुळे असा निर्णय घेणारे बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन केलं पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मध्य भोजनापासून भूके राहावे लागेल. त्यामुळे सदावर्ते यांनी शालेय शिक्षण मंत्री, मराठवाडा विभागीय आयुक्त तसेच शिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून हा आदेश मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची" मागणी केली आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त...

मनोज जरांगे यांची आज बीड शहरात निर्णायक इशारा सभा होत आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा याच सभेतून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या सभेला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेसाठी पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सभेसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांना सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहे. सोबतच इतर जिल्ह्यातून देखील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची फौज मागवण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी आणि सभेसाठी येणाऱ्या रस्त्यांवर देखील पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. यासोबतच वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलीस देखील सज्ज असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मनोज जरांगें यांची आज बीड जिल्ह्यात 'निर्णायक इशारा सभा'; पुढील आंदोलनाची घोषणा होणार

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Embed widget