एक्स्प्लोर

Manoj Jarange : येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केला? बीडच्या सभेत जरांगेंचा भुजबळांवर तुफान हल्ला

Manoj Jarange Beed Sabha : आजची बीडमधील सभा ही मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय आहे असं मनोज जरांगे म्हणाले.  

Manoj Jarange Beed Sabha : बीडमध्ये आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमला असून मराठा आरक्षण (Maratha Reservation) आता कसं आणायचं ते बघाच, मराठा आरक्षण मिळवणारच असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला. मराठा समाज आतापर्यंत शांत आहे, पण सरकारने झोपू नये असंही ते म्हणाले. ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केला? असा सवाल करत जरांगे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) तुफान हल्ला केला. 

मनोज जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाला डाग लावण्यात आला आहे, कुणी म्हणतंय आमची घरं जाळली, तर कुणी म्हटलं हॉटेल जाळली. आपल्यावर खोटे आरोप करण्य़ात आले. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले, तो समाज कुणाची घरं कशाला पेटवेल? यांच्याच लोकांनी हॉटेलं जाळली आणि नाव मराठा समाजावर घातलं. सरकारही यांचंच ऐकतंय. पण आता मराठा समाज जागा झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कसं आणायचं ते बघाच."

नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवणार

राज्य सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले की, "सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल, आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल. तुमचं राजकीय अस्तित्व संपवलं जाईल. तुम्ही ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर पुढचं आंदोलन तुम्हाला 100 टक्के जड जाणार."

मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम

मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझं नातं हे माय-लेकाचं आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पीढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पीढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झालं. आता मराठा जागा झाला आहे. 

देव जरी आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणार

देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, आपण तेच घेणार असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांनी यांनी मोठं करायचं आणि मराठ्यांचे मुडदे पडत असताना यांनी त्याकडे पाहायचं नाही, आता तसं करायचं नाही. सरकार गांभिर्याने घेत नाही, पण आता त्यांना वठणीवर आणण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांची मतं घेऊन त्या भुजबळासारख्यांना मोठं केलं जातंय. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुडदे बघत बसताय. 

शांततेत आंदोलन करा, ते ब्रह्मात्र आहे

सरकारने पुन्हा एकदा डाव रचला. मराठा समाजातील आंदोलकांना नोटिसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊन सभेला गेला तर तो जप्त केला जाईल असं त्यात म्हटलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आंदोलन करायचं पण शांततेत, ते ब्रह्मात्र आहे. शांततेत आंदोलन केल्यास ते थांबवायचं कुणाच्यात हिंमत नाही. 

Manoj Jarange Patil Beed Sabha LIVE: मनोज जरांगे पाटील यांची बीड निर्णायक इशारा सभा लाईव्ह ABP majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget