(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News: आधी कानाला हेडफोन लावला, त्यानंतर बेल्टने खिडकीला गळफास; बीड शहरातील घटना
Beed Crime News: डोअर पॉलिशचं काम करणाऱ्या एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा केला आहे.
Beed Crime News: बीड शहरात (Beed City) एक धक्कादायक घटना समोर आली असून, डोअर पॉलिशचं काम करणाऱ्या एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. विशेष म्हणजे या कामगाराने आधी कानाला हेडफोन लावला आणि त्यानंतर बेल्टने खिडकीला गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा केला आहे. बेल्टने खिडकीला गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कामगाराने कानाला हेडफोन लावून त्यानंतर बेल्टने खिडकीला गळफास घेतल्याचा प्रकार बीड शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातील नवीन इमारतीमध्ये रविवारी (12 मार्च) सकाळी दिसून आला. मयत हा या ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मजुरी करत असल्याचे समोर आले आहे. सुरज ललन यादव असे मजुराचे नाव आहे. बीड जिल्हा रुग्णालय परिसरात नवीन इमारतीचे काम सुरु आहे. तर सुरज हा मजुरीसाठी सात दिवसांपूर्वी आला होता. तो डोअर पॉलिशचे काम करत होता.
आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (11 मार्च) मध्यरात्री सुरज यादव याने बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खिडकीला बेल्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या कानाला मोठा हेडफोन होता. घटनेची माहिती मिळताच ठाण्यातील बाळासाहेब सिरसाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट असून, घटनेसंदर्भात पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे.
पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अढळला
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी मोहखेड जवळील विहिरीत तरंगताना आढळून आला आहे. महेश लक्ष्मण सोळंके (वय 25 वर्षे, रा. मोहखेड, धारुर) असे या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी सिरसाळा पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल झाली होती.
तर 7 मार्च रोजी महेश हा शौचास जातोय म्हणून घरातून बाहेर पडला होता. मात्र घरी परत न आल्याने त्याचे वडील लक्ष्मण सोळंके यांनी सिरसाळा पोलिसात हरवल्याची नोंद 8 मार्च रोजी केली होती. दरम्यान, 10 मार्च रोजी रात्री या तरुणाने शौचास नेलेला डबा मोहखेड शिवारातील शासकीय विहिरीजवळ आढळला. याची माहिती सिरसाळा पोलिसांना देण्यात आली होती. शनिवारी सकाळी पोलिसांनी धाव घेतली असता, त्यांना मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनास्थळावरच शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
शेतीच्या वादातून लहान भावाकडून मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून; हिंगोली जिल्ह्यातील घटना