Vinayak Mete: अपघातात आधी गोपीनाथ मुंडे, आता मेटेंना गमावलं; बीडकरांसाठी भरुन न निघणारी पोकळी
Beed News:बीडच्या विकासात मोठा वाटा असलेल्या मुंडे-मेटे या दोन्ही नेत्यांनी अपघातात आपला जीव गमवला आहे.
Vinayak Mete Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या या अपघाती निधनानंतर पुन्हा एकदा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण बीडकरांनी झाली आहे. कारण बीडच्या विकासात मोठा वाटा असलेल्या या दोन्ही नेत्यांनी अपघातात आपला जीव गमवला आहे. त्यामुळे आधी गोपीनाथ मुंडे आणि आता मेटे यांना गमावने बीडकरांसाठी भरुन न निघणारी पोकळी ठरणार आहे.
राज्याच्या राजकारणात बीड जिल्हा नेहमीच केंद्रबिंदू ठरला आहे. बीडची ओळख फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. देशात 2014 साली भाजपची केंद्रात सत्ता आली त्यावेळी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन पुन्हा बीडच्या विकासाचा निश्चय करून दिल्लीहून निघालेल्या मुंडे यांचा अपघाती निधन झाले. बीडकरांसाठी हा मोठा धक्का होता. मुंडे यांची पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. त्यातच आता मेटे यांना सुद्धा बीडकरांनी अपघातात गमावलं आहे.
असा होता मेटेंचा प्रवास...
- जन्मगाव: राजेगाव तालुका केज, जिल्हा बीड
- पत्नी: ज्योती मेटे-लाठकर (सहकार उपायुक्त, नाशिक)
- मुलं: एक मुलगी एक मुलगा
- शिक्षण: 10 वि पर्यंत
- पदवी: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक
- जन्म तारीख: 30 जून 1970, वय 59 वर्षे
- 12 वी नंतर मुंबई येथे त्यांच्या मामांकडे राहायला गेले. तेथे रंगकाम करण्याचे, भाजीपाला विकण्याचे काम केले.
- गावाकडे आईसाठी अजूनही पत्र्याचे घर आहे.ते घर बांधायचे स्वप्न अधुरे आहे. त्याचे काम सुरू करणार होते
- त्याच दरम्यान मराठा महासंघाशी जोडले गेले.
- वयाच्या 29 व्या वर्षी युती सरकारच्या काळात विधान परिषदेवर संधी मिळाली.
- आतापर्यंत पाचवेळा विधान परिषदेत त्यांची निवड झालेली आहे.
- 1998 ला महाराष्ट्र विकास पार्टीची स्थापना. नंतर राष्ट्रवादी मध्ये विलीन. 2003 ला शिवसंग्रामची स्थापना
जिल्ह्यातल्या राजेगाव येथे झाला. - विनायक मेटे हे तरुण असतानाच सामाजिक आणि चळवळीत सहभागी झाले मराठा महासंघाच्या माध्यमातून मेटे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
- अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत मराठा महासंघात काम करत असताना विनायक मेटे हे 1996 साली भाजपच्या सरकारमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले होते.
- मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी गावागावात आपली ओळख निर्माण केली आणि एक तरुण नेतृत्व म्हणून ते बीड जिल्ह्यात पुढे आले.
- त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये आपली स्वतःची शिवसंग्राम ही संघटना काढली आणि संघटनेच्या विस्तारासाठी मेटे महाराष्ट्रभर फिरत होते.
- शिवसंग्राम च्या माध्यमातून विनायक मेटे यांनी महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधली होती आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून कायम ते लढा देत होते.
- संघटना काढल्यानंतर मेटे यांनी भारतीय संग्राम परिषद नावाचा आपला एक पक्ष स्थापन केला.
- 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मेटे यांनी बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती.