आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा उद्यापासून सातवा टप्पा; असा असणार संपूर्ण दौरा
Aaditya Thackeray: विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते.
![आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा उद्यापासून सातवा टप्पा; असा असणार संपूर्ण दौरा maharashtra News Aditya Thackeray Aurangabad News Seventh stage of Aditya Thackeray Shivsamvad Yatra from tomorrow आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा उद्यापासून सातवा टप्पा; असा असणार संपूर्ण दौरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/05/50ca9e658989ab29879fc640974c40061675596479795443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा (Shiv Samvad Yatra) सातवा टप्पा आता सुरु होत असून, 6 जानेवारी म्हणजेच उद्यापासून यात्रेला सुरुवात होत आहे. एकूण चार दिवसांची ही शिवसंवाद यात्रा असणार असून, नाशिक, औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयातून जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते. तर आता याच यात्रेचा हा सातवा टप्पा असणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसंवाद यात्रा टप्पा सातवा (वेळापत्रक)
दिवस पहिला: 06 फेब्रुवारी 2023
1) ठिकाण: इगतपुरी, मुंढेगाव (संवाद)
वेळ- दुपारी 12.45 वाजता
2) ठिकाण: नाशिक सिन्नर येथे वडगाव पिंगळा (संवाद)
वेळ- दुपारी 02.30 वाजता
3) ठिकाण: सिन्नर, नाशिक (संवाद)
वेळ- सायंकाळी 03.45 वाजता
4ठिकाण: पळसे, जिल्हा नाशिक (संवाद)
वेळ- सायंकाळी 04.45 वाजता
5) ठिकाण: नाशिक (मेळावा)
वेळ: सायंकाळी 05.45 वाजता
मंगळवार 7 फेब्रुवारी रोजी
1) ठिकाण: चांदोरी (निफाड) (संवाद)
वेळ- सकाळी 11.15 वाजता
2) ठिकाण: विंचूर (निसर्ग लॉज), नाशिक (संवाद)
वेळ- दुपारी 01.00 वाजता
3) ठिकाण: नांदगाव, नाशिक (संवाद)
वेळ- दुपारी 03.00 वाजता
4) ठिकाण: महालगाव (वैजापूर), औरंगाबाद (संवाद)
वेळ- सायंकाळी 05.35 वाजता
08 फेब्रुवारी रोजी
1) ठिकाण: सोमठाणा, बदनापूर, जि. जालना (संवाद)
वेळ- सकाळी 11.30
2) ठिकाण: रामनगर, जालना (संवाद)
वेळ- दुपारी 01.15 वाजता
3) ठिकाण: घनसावंगी, जि. जालना (संवाद)
वेळ- दुपारी 03.00 वाजता
4) ठिकाण: गेवराई, जि. बीड (संवाद)
वेळ- सायंकाळी 04.35
09 फेब्रुवारी रोजी
1) ठिकाण - बिडकीन (पैठण), जि.औरंगाबाद (संवाद)
वेळ- सकाळी 11.30 वाजता
2) ठिकाण: पाटोदा (औरंगाबाद प.) (संवाद)
वेळ- दुपारी 12.40
3) ठिकाण: नंद्राबाद (रत्नपुर) (संवाद)
अंबादास दानववेंचाही सहभाग...
उद्यापासून आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून या यात्रेला सुरवात होणार आहे. मात्र याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या या चार दिवसांच्या शिवसंवाद यात्रेत ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील सहभागी असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या चार दिवसांच्या दौऱ्यात दानवे देखील चार दिवस उपस्थित राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Raj Thackeray : पुणे पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)