एक्स्प्लोर

Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकरांच्या मागे पंकजा मुंडेंचा हात? मनोरमा खेडकर यांची मुंडेंच्या ट्रस्टला 12 लाखांची देणगी

Pankaja Munde : खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडे यांच्याशी असलेले संबंध समोर आले असून मुंडे यांच्या ट्रस्टला पूजा खेडकर यांच्या आईने, मनोरमा खेडकरांनी 12 लाखांची देणगी दिल्याचं समोर आलं आहे.

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा सुरु असताना खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडेंसोबत (Pankaja Munde) असलेले संबंध समोर आलेत. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलंय. 3 ऑक्टोबर 2023 रोजी एका चेकच्या माध्यमातून ही देणगी देण्यात आली आहे. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला दीड किलोचा चांदीचा मुकुटदेखील अर्पण केला होता. त्याचबरोबर दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षांपासून भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत. 

स्वतः दिलीप खेडकर हे भाजपशी संबंधित राहिले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधून तिकीट न मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन लोकसभेची निवडणूक लढवली होती.

पूजा खेडकरांना बनावट सर्टिफिकेट कुणी दिली? 

आपल्या चमकोगिरीने अडचणीत आलेल्या आणि नंतर एकाहून एक कारनामे बाहेर पडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यामागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे असा प्रश्न विचारला जात आहे. पूजा खेडकरांनी बनावट अंपंगत्वाचा दाखला तसेच खोटी माहिती देऊन ओबीसी क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढल्याचं समोर आलं आहे. यापैकी कोणत्याही प्रवर्गात त्या बसत नसताना त्यांना ही खोटी सर्टिफिकेट कुणी दिली असा प्रश्न विचारला जात आहे. 

खेडकर कुटुंबीयांचा शोध सुरू

खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याच पुणे पोलिसांच म्हणणं आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत. 

पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचे गेट बंद असल्याचे  आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे चित्रिकरण केले आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Beed News: बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान
बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान
Beed Crime Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
Beed Crime : बायको नांदायला येईना, दारुच्या नशेत पतीने थेट सासर्‍याचं घरच पेटवलं; बीडच्या पिंपळा धायगुडा येथील घटना
बायको नांदायला येईना, दारुच्या नशेत पतीने थेट सासर्‍याचं घरच पेटवलं; बीडच्या पिंपळा धायगुडा येथील घटना

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget