एक्स्प्लोर

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, पुड्या खाणं बंद करा, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

बीड : दारु प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, तंबाखू- पुड्या खाणं बंद करा, असा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

बीड : दारु प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, तंबाखू- पुड्या खाणं बंद करा, असा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी बीड, परळीमध्ये (Beed) विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. 

गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील रक्तदान केलं.  रक्तदान करताना यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हातभट्टीची दारु पिऊ नका, तंबाखू, पुड्या खाऊन कुठेही थूकू नका, असाही सल्ला यावेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिला. त्यांनी दिलेल्या या सल्ल्याने पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका.त्याने विष बाधा होते.पिण्याला मी नाही म्हणत नाही. तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तंबाखू-पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता, कसं दिसते ते. यापुढे तंबाखू-पुड्या खाऊ नका. तसेच चांगलं चांगलं खा. मास मच्छी व्हेजिटेरियन खा आणि आरोगी रहा असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करताना पंकजा मुंडे बोलत होत्या. 

पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन - 

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबर रोजी दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात. या सर्वांनी यावेळी आपआपल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी. तसेच गोपीनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे, असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आज केले.

मुंडे साहेबांचे स्वप्न जनतेसाठी होते, त्यामुळेच त्यांनी मला तुमच्या ओटीत टाकले आहे. मुंडे साहेब 100 वर्षे जगावेत असे तुम्हाला आम्हाला वाटतं होते. मात्र, साहेब जगू शकले नाहीत. मी प्रभु वैद्यनाथाला अभिषेक घातला, बुध्द विहारात जावून बौध्द वंदना केली. त्यानंतर हजरत मलिकशाह दर्गा येथे चादर चढवली आणि मुंडे साहेबांसाठी प्रार्थना केली. मुंडे साहेब आज आपल्या नसले तरी त्यांचे विचार आणि संस्कार आजही आपल्यात आहेत. मुंडे साहेबांचे विचार शतायुषी व्हावेत हाच संकल्प आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget