एक्स्प्लोर

वाल्मिकचा मुलगा श्री अन् साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं; शवविच्छेदन अहवाल, विजयसिंह बांगर समोर

महादेव मुंडे हत्याप्रकरणात यश मिळत असून सरकार या घटनेची दखल घेत आहे. महादेव मुंडे यांच्या शववविच्छेदनाचे रिपोर्ट माझ्या हाती आले आहेत.

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadeo munde) हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने तीव्र आंदोलन केल्यानंतर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने याप्रकरणी एसआयटी नेमली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही याप्रकरणी सरकारने एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. दरम्यान, वाल्मिक कराडनेच (Walmik karad) महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप वाल्मिक कराडचा जुना सहकारी असलेल्या विजयसिंह बांगर यांनी यापूर्वी केला होता. आता पुन्हा एकदा बांगर यांनी बीडमध्ये (Beed) पत्रकार परिषद घेत महादेव मुंडेंना कसं आणि कुठं मारलं याची इतंभू माहिती दिली. तसेच, वाल्मिक कराडसह त्याचा मुलगा श्री कराडही या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. 

महादेव मुंडे हत्याप्रकरणात यश मिळत असून सरकार या घटनेची दखल घेत आहे. महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदनाचे रिपोर्ट माझ्या हाती आले आहेत. त्यानुसार, त्यांच्या शरीरावर 15 ते 16 खोलवर जखमा असून अमानुष मारहाण असल्याचे यात उघड होत आहे. महादेव मुंडे यांची हत्या झाली कधी? असा प्रश्न विचारला असता ते घरी जात असताना कराडचा मुलगा श्री आणि त्याच्या साथीदाराने रेकी केली आणि हत्या केली. मुंडेंचा जीव जागेवर गेला नाही, तर क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या पायावर जखमा करण्यात आल्या. रेंगाळत असताना गालावर वार केला, नंतर अन्न नलिकेवर वार करण्यात आला. या सर्व जखमा खोलवर आहेत. 

मी खोट बोलत नाही, या फोटोत ते स्पष्ट दिसत आहे. त्यांचा जीव थोडा राहिला होता, त्यावेळी मानेवर मार देण्यात आला. किमान 20 मिनिटे मारहाण झाली, अशी माहिती विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री कराड, गोट्या गित्ते आणि त्याच्या साथीदारांनी ही मारहाण केली. अमानुष मारहाण करत त्यांचे मास तोडून नेले. छोट्या फ्लॉट मधून इगो हर्ट झाला आणि मारहाण झाल्याचेही बांगर यांनी सांगितले. 

नेमलेल्या एसआयटीमध्ये IPS अधिकारी नाही

सरकारला विनंती आहे की, आरोपींना तत्काळ अटक करावी. वाल्मिक कराडच्या मुलाचा देखील यात समावेश आहे. याप्रकरणी SIT नेमण्यात आली मात्र यात IPS अधिकारी नेमण्यात आला नाही. चांगले अधिकारी यात नेमले पाहिजे, अशी मागणीही बांगर यांनी केली आहे. तहसील कार्यालय परिसरात अज्ञात ठिकाणी त्यांचा मृतदेह टाकण्यात आला होता, परळी पोलिस देखील यात सहभागी असतील. हत्या होत असताना पोलिस हाटकत होते. त्यामुळे, याप्रकरणात मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर अराजकता पसरेल. म्हणून, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे, अशी माहितीही बांगर यांनी दिली. 

हेही वाचा

मुंबईतील मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार; सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget