एक्स्प्लोर

Beed Wadwani Bandh: पाथर्डी, शिरुर, परळीपाठोपाठ आता वडवणी बंद; पंकजा मुंडेंबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टवरुन मराठवाड्यात तणाव

Wadwani News Updates: पंकजा मुंडेंबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टवरुन मराठवाड्यात वाढचा तणाव पाहायला मिळत आहे. पाथर्डी, शिरुर, परळीपाठोपाठ आता वडवणी बंदची हाक देण्यात आली आहे.

Beed Wadwani News Updates: बीड : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बीड मतदारसंघात (Beed Constituency) भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या. या पोस्टमध्ये भावनिक पोस्टसोबतच आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल झाली होती. या आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव निर्माण झाला होता. यानंतर वंजारी समाज आक्रमक झाला असून सुरुवातीला पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर शिरुर आणि परळी शहरसुद्धा बंद करण्यात आलं होतं आणि आज वडवणी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्यानंतर केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आलं. मात्र, बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या, तर बजरंग सोनावणे विजयी झाले. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यातीलच एका आक्षेपार्ह पोस्टवरुन मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, आक्षेपार्ह्य पोस्टवरुन निर्माण झालेल्या वादाचे परिणाम काही केल्या थांबायला तयार नाहीत. 

आक्षेपार्ह पोस्ट, तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं? 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत बीडचा निकाल अत्यंत धक्कादायक होता. बीडमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळवला. पण, परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळालं. 

बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचा निकाल जाहीर झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीनं फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट लिहिली. 

बीड लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या लढतीत पंकजा मुंडे पराभूत 

मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाली. ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झालेल्या बीड लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांचा विजय मिळाला. बजरंग सोनवणे यांचा बीड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे 60000 पेक्षाही जास्त मताची लीड मिळाली, त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्येसुद्धा बजरंग सोनवणे यांना लीड मिळाली.  केज विधानसभा मतदारसंघात यांना मिळालेल्या मताधिक्यावर बजरंग सोनवणे हे खासदार झाले. पंकजा मुंडे यांना सर्वाधिक लीड परळी विधानसभा मतदारसंघातून 74 हजार मतांची मिळाली. त्या खालोखाल आष्टी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 32000 मतांची लीड मिळाली. माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र अवघ्या 1000 मताची लीड पंकजा मुंडे यांना मिळाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget