(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : WhatsApp वर I Am Sorry स्टेटस ठेवून खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाची आत्महत्या
Beed News :खाजगी शिकवणी घेणाऱ्या तरुण शिक्षकाने व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर 'आय एम सॉरी' असे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Beed News : खाजगी शिकवणी घेणाऱ्या तरुण शिक्षकाने व्हॉट्सअॅप (WhatsApp) या मेसेजिंग अॅपवर 'आय एम सॉरी' ( I Am Sorry) असे स्टेटस (Status) ठेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या (Ambajogai) घाटनंदुर गावात ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणारा हा तरुण शिक्षक घाटनांदुर गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य देखील होता. नितेश कोकणे असं त्याचं नाव आहे.
नितेश कोकणे यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नितेश कोकणे हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य असून खाजगी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे. त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर उच्चशिक्षित असलेल्या नितेश कोकणे यांनी आत्महत्या का केली याचा तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.
औरंगाबादमध्ये फोनवर मित्रासोबत बोलताना विद्यार्थिनीचा हॉस्टेलमधील रुममध्ये गळफास
दरम्यान औरंगाबादच्या (Aurangabad) राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक घटना समोर आली होती. राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पाचव्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आपल्या एका मित्रासोबत फोनवर बोलताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती आहे. युक्ती सुशील बुजाडे (रा. त्रिमूर्तीनगर, जि. चंद्रपूर, ह. मु. मुलींचे वसतिगृह, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बीडमध्ये खुनाचं सत्र सुरुच, दोन दिवसात दोन खून
बीड शहरातल्या पालवन चौकामध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. दत्ता इंगळे वय 40 वर्षे असं त्याचं नाव असून तो वेटर आणि ड्रायव्हरच काम करायचा. दत्ता इंगळे हा हिवरसिंगा गावचा रहिवासी असून अज्ञातांनी त्याची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पालवन चौकात टाकून दिला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केतन राठोड आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यानदत्ता इंगळेची हत्या कोणी केली आता पोलीस करत आहेत. दरम्यान बीडमध्ये दोन दिवसात दोन खून झाले आहेत.
हेही वाचा
Aurangabad News : मित्रासोबत फोनवर बोलतानाच विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या