Beed Crime News : रस्त्यावर चालणाऱ्यांचे मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Beed Crime News : रस्त्यावर मोबाईलवरून बोलणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकवायचे आणि काही क्षणात त्या ठिकाणाहून दुचाकीवरून पोबारा करायचे.
Beed Crime News: मोबाईलवर बोलत असताना रस्त्यावर चालणाऱ्यांचे मोबाईल (Mobile) हिसकावणाऱ्या टोळीतील तिघा जणांना बीडच्या (Beed) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Police) अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे आरोपी रस्त्यावर मोबाईलवरून बोलणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकवायचे आणि काही क्षणात त्या ठिकाणाहून दुचाकीवरून पोबारा करायचे. अशा अनेक तक्रारी बीड शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तिघांवर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सागर ऊर्फ बाळू बबन भांडवलकर, अभिषेक बंडु घोलप (दोघे रा. अयोध्या नगर, बीड) यांना अटक केली.
मोबाईलवर दुचाकीवर येऊन मोबाईल बोलत रस्त्याने चालणाऱ्यांचे हिसकावण्याऱ्या टोळीचा बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चोरट्यांना गजाआड करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 14 मे रोजी धर्मराज बाबूराव प्रभाळे यांचा कॅनल रोडवरील सूर्या लॉन्स परिसरात मोबाईलवर बोलत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या तिघांनी मोबाईल हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी झाली कारवाई...
रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकवणारी टोळी शहरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या आरोपींचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं होतं. तर या सर्व प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. तर, सदरील गुन्हा सागर ऊर्फ बाळू बबन भांडवलकर, अभिषेक बंडु घोलप यांनी केला असल्याची माहिती गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळाली. त्यामुळे पोलिसांनी दोघांना तात्काळ ताब्यात घेतलं. तसेच त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील एक व आणखी एक चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तर, पुढील तपासकामी त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अशोक दुबाले यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीड जिल्ह्यात 18 तर जालन्यात 19 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू; पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास निर्बंध