Beed : शरद पवारांच्या सभेतील गर्दी पैसे देऊन जमवली?; व्हायरल व्हिडीओनंतर विरोधकांची टीका
Sharad Pawar Sabha Viral Video: सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी जमवल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Sharad Pawar Sabha Viral Video: राष्ट्रवादी पक्षात (NCP) झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पाहायला मिळत आहे. दरम्यान, गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी शरद पवारांची बीडमध्ये (Beed) भव्य जाहीर सभा पार पडली. बीडमधील अनेक आमदार सोडून गेल्यावर देखील शरद पवारांच्या सभेला झालेली गर्दी चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, ही गर्दी पैसे देऊन जमवण्यात आल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पवारांच्या सभेत काही महिला पैसे वाटप करत असल्याचे काही तथाकथित व्हिडीओ (Video) देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या सभेनंतर आता दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमान सभा पार पडली असून, या सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी जमवल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिला सभेला आलेल्या दुसऱ्या महिलांना पैसे देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेतला असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, शरद पवार यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी लोकांना पैसे वाटले असा आरोप विरोधकाकडून या सभेनंतर करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे सर्वच आमदार हे अजित पवार गटात सामील झाले होते. मात्र, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी स्वाभिमान सभेचे आयोजन केलं. मात्र, याच सभेला काही महिलांना पैसे देऊन आणण्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विरोधक यावरुन टीका करत असल्याच पाहायला मिळत आहे.
उत्तर सभेत अजित पवार काय बोलणार?
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार हे अजित पवारांच्या गटातील महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेत आहेत. 17 ऑगस्ट रोजी त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये सभा घेतली. पण, आता शरद पवारांच्या याच सभांच्या विरोधात अजित पवार देखील उत्तर सभा घेणार आहे. शरद पवार यांची स्वाभिमान सभा झाल्यानंतर अजित पवार देखील बीडमध्ये 27 तारखेला एक सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेमध्ये धनंजय मुंडे आणि अजित पवार या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर काही बोलतील का? हे देखील पाहावं लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar : अजित पवार गटाकडून पक्षबांधणीवर भर, नऊ मंत्र्यांना तीन ते चार जिल्ह्यांची जबाबदारी