एक्स्प्लोर

Beed Massajog Sarpanch case : अंबादास दानवेंनी सभागृहात थेट वाल्मिक अण्णाचं नाव घेतलं, मुख्यमंत्री म्हणाले, AI वापरु, कारवाई करु!

Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख अपहरण हत्या प्रकरणाचे पडसाद विधानपरिषदेत उमटले.

नागपूर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे (Beed Massajog Sarpanch) पडसाद आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हा मुद्दा उपस्थित करत, आरोपी हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे असल्याचा आरोप केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं. 

अंबादास दानवे काय म्हणाले? 

बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्या प्रकरणात वॉचमनने एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. पोलीस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत आहेत. आरोपी बाहेर फिरत आहेत. ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात. बाप तो बाप है म्हंटलं जातंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक तालुका अध्यक्ष यात आहे. तीन गुन्हेगार राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. एक मंत्री आहेत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक अण्णा (Walmik Karad) नावाची ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला आहे. हे गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. पिआया सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत. मंत्र्यांचे जवळचे बोलणं योग्य नाही. कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो. आम्ही AI टेक्नॉलॉजी वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

आरोपी कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल. ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. SIT मार्फत चौकशी करुन, यामागे जो कोणी असेल त्यांना शोधून काढून कारवाई करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 

मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या (Massajog Sarpanch Santosh Deshmukh case)

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे 9 डिसेंबरला भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. 

 संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 3  वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीने  मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे गाडी चालवीत होते. ते केज येथून मस्साजोगकडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्या जवळ एका काळ्या रंगाची  स्कार्पिओ आडवी लावली. त्या गाडीतुन 6 इसम खाली उतरले. त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडून गाडीत पाहिले आणि दुसऱ्याने डाव्या साईडच्या बाजूला जावून सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख  यांना  काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवून केजच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. 

अपहरण केल्यानंतर अपहरण झल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथके तपासाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दैठणा फाटा येथे मिळून आला. मयताच्या अंगावर मारहाणीचे आणि शास्त्राचे वार होते.  

दरम्यान सुदर्शन घुले यांनी दिनांक 6 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेले सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून, मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्याxनी त्यांचा खून केला असल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपी म्हणून विष्णू चाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याचीच दखल पक्षाने घेतली असून विष्णू चाटे याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. एबीपी माझा सोबत बोलताना धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या अपहरण काळामध्ये त्यांना सोडवण्यासाठी याच विष्णू चाटे सोबत बातचीत सुरू असल्याचे सांगितले आहे. 

दोन आरोपींना अटक

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी 10 डिसेंबरला दोन आरोपींना अटक केलीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी अपहरण करून खून करण्यात आला.  अहमदनगर/अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत होती. अखेर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जयराम चाटे आणि महेश केदार असे या आरोपींची नाव असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांनी सहा पथक स्थापन केले आहे. या पथकांकडून धाराशिव आणि बीडमध्ये शोध घेण्यात आला. अखेर या दोघांना केज तालुक्यातील तांबवा शिवारातून अटक करण्यात आली. शनिवारी झालेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीशी या प्रकरणाचा संबंध आहे.  

वाल्मिक कराडांवर गुन्हा 

धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन घुलेवर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे.  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेट कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पाची कामं सुरु आहेत. ही कामं बंद करण्याची धमकी देत कामं सुरु ठेवायची असल्यास 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Beed Murder case VIDEO : सरपंच हत्येवरुन Danve - Fadnavis भिडले

 

संबंधित बातम्या  

Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पोलिसांना महत्त्त्वाचा धागा सापडला 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Donald Trump : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Donald Trump : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget