Beed Crime News: देवेंद्र ढाकांचा त्या दिवशी दुपारी यशला अखेरचा फोन; रात्री भररस्त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, जवळ घेऊन विचारलं पण त्यानं... बीडमधील पत्रकाराच्या मुलासोबत त्या रात्री नेमकं काय घडलं?
Beed Journalist Son Murder Case: बीडमध्ये एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आला. जेव्हा त्याच्या वडिलांनी हे कळालं तेव्हा ते घटनास्थळी पोहोचले. त्यांना त्यांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

बीड: बीडमध्ये एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यात चाकूने भोसकून खून (Beed Crime News) करण्यात आला. यश ढाका हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरले (Beed Crime News) असून या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड येथील माने कॉम्पलक्स परिसरात यश वरती वार करून त्याला संपवलं (Beed Crime News) गेलं. मित्रानेच जुन्या वादातून चाकूने छातीत सपासप वार करून त्याचा खून केला होता. या घटनेत मृत्यू झालेल्या यश ढाका याच्या वडिलांनी बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे हजर येऊन तक्रार दाखल केली आहे. (Beed Crime News)
पत्रकार देवेंद्र ढाका (वय 45 वर्षे रा. बलभीम नगर पेठ बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्याचे कुटुंब बीड येथे वास्तव्यास असून ते खाजगी नोकरी करून घर चालवतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा यश ढाका (वय 20 वर्षे), लहान मुलगा युवराज देवेंद्रसिंग ढाका (वय 17 वर्षे) अशी दोन मुलं आहेत.
Yash Dhaka Murder Case : रात्री 08.30 वाजेच्या सुमारास फोन आला अन्....
देवेंद्र ढाका यांनी या प्रकरणी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, देवेंद्र ढाका यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २५ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे अकरा वाजता ते कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्या वेळी त्यांचा मुलगा यश घरीच होता. दुपारी जवळपास सव्वादोनच्या सुमारास देवेंद्र यांनी यशला फोन करून, त्याच्या लहान भावाला युवराजला MIDC परिसरातून घरी आणण्यास सांगितले. मात्र यशने गाडी नसल्याचे तसेच तो बाहेर असल्याचे सांगितले. त्यावर देवेंद्र यांनी “ठीक आहे, मी दुसऱ्याला पाठवतो,” असे सांगत फोन ठेवला. यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास ते बसस्थानकात असताना त्यांचे चुलत बंधू अमरसिंग ढाका यांनी फोन करून माहिती दिली की, यशवर माने कॉम्प्लेक्स येथे हल्ला झाल्याची बातमी मिळाली आहे. हे कळताच देवेंद्र तातडीने माने कॉम्प्लेक्स परिसरात पोहोचले. तेथे गणेश वॉशिंग कंपनीसमोर रस्त्यावर यश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अवस्थेत दिसून आला.
Yash Dhaka Murder Case : त्याचा शर्ट, पॅन्ट रक्ताने माखलेले
त्या क्षणी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. मी यशकडे धावत जाऊन त्याला जवळ घेतले असता, त्याच्या छातीच्या डाव्या बाजूस धारदार शस्त्राने वार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याचा शर्ट आणि पॅन्ट पूर्णपणे रक्ताने माखलेले होते. मी वारंवार त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान, त्याच्या मित्रांनी रुग्णवाहिकेला कॉल केला होता. तेथे उपस्थित असलेल्या दोन मित्रांनी मला सांगितले की सूरज आप्पासाहेब काटे आणि त्याच्या साथीदारांनी यशवर हल्ला केला आहे.थोड्याच वेळात रुग्णवाहिका आली आणि आम्ही यशला तातडीने बीड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी देवेंद्र ढाका यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा (कलम 302) दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत. या फरार आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईक आणि नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर मुसळधार पावसात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनाक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. यशच्या निधनामुळे ढाका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
























