एक्स्प्लोर

आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न

महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे.

बीड : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari munde) यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, पोलीस (Police) अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे यांची आज तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडेंना ताब्यात घेतले. त्यानंतर, त्यांना तात्काळ बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आज आंदोलनावेळी त्यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. 

बीडमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम आज संपला. त्यामुळे, ज्ञानेश्वरी यांनी आपल्या नातेवाईकांसह बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले होते. यावेळी, पोलीस अधीक्षकांसोबत त्यांची चर्चा देखील झाली. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा झाली- सतीश फड

माझ्या बहिणीचा संयम सुटला आणि तिने आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी दिली. या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ निर्णय घेण्याची गरज असून अधिवेशनात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी फड यांनी केली. महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा वर्ग केला आहे.  तसेच, आरोपीच्या अटकेसाठी पथक पाठविण्यात येणार होते. मात्र, माझ्या बहिणीचा संयम सुटला. दरम्यान, पुढील उपचारासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा घटनाक्रम -

20 ऑक्टोबर 2023 च्या संध्याकाळी महादेव मुंडे यांनी 6 वाजता ट्युशनवरुन मुलांना घरी सोडले. त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले. आझाद चौकात मित्राला भेटले. आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वाजता आढळून आली. ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली. याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुकसह आणखी काही कागदपत्रं होती.ही मोटरसायकल सापडली. मात्र महादेव मुंडे कुठे होते हे माहिती नाही. या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.

21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला.हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र तो फोन स्विच ऑफ आला. त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले.महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला  होता आणि गळा कापलेला होता. त्याचबरोबर हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मी  कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते.मृतदेहाचे शवविच्छेदन  करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.

हेही वाचा

 महादेव मुंडेंच्या पत्नी, आई-वडील, मुलाकडून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांसोबत झटापट, पेट्रोलच्या बॉटल जप्त

मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget