घरासमोर खेळणाऱ्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, न्यायालयाने सुनावली 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
Beed Crime News : या संपूर्ण प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.
Beed Crime News : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये घरासमोर खेळणाऱ्या एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला अंबाजोगाई सत्र न्यायालयाने वीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 15 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. किरण शेरेकर अस या आरोपीचे नाव असून, दीड वर्षापूर्वी त्याने एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर यावर निकाल देतांना न्यायालयाने आरोपी किरणला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
गेल्यावर्षी 19 मार्च रोजी नऊ वर्षीय पिडीत बालिका मैत्रिणीसोबत घरासमोर खेळत होती. यावेळी तिच्या घरातील सर्वजण शेतात कामासाठी गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिडीतेच्या मैत्रिणी चप्पल आणण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून किरण राजेभाऊ शेरेकर (वय 23 वर्षे) या तरुणाने पिडीतेस बहाण्याने त्याच्या घरी बोलावून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कोणालाही काहीही एक सांगितल्यास तुला व तुझ्या चुलत्याला मारून टाकीन अशी धमकी दिली. या सर्व घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला. त्यामुळे आरोपी किरण विरोधात अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा गुन्हा नोंद करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
या प्रकरणाची सुनावणी अपर सत्र न्या. संजश्री घरत यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीतेची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. तसचे सदर प्रकरणातील वैद्यकिय तपासणी करणाऱ्या डॉ. ज्योती डावळे यांची साक्ष देखील अत्यंत महत्वाची ठरली. साक्षीपुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद व त्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून नायालयाने आरोपी किरण शेरेकर यास दोषी ठरवून 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पंधरा हजार रूपये दंड ठोठावला आहे.
'या' साक्षी महत्वाच्या ठरल्या...
या संपूर्ण प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉ. ज्योती डावळे यांची साक्षदेखील महत्त्वाची ठरली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद, पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी किरणला वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावला.
तर, या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण बा. फड यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली व त्यांना अॅड. अनंत बी. तिडके यांनी सहकार्य केले. तर, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर यांनी केला व कोर्ट पोलीस पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकुर, पो.हे.कॉ. गोविंद कदम, पो. हे. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे.कॉ. शालन राउत यांनी काम पाहिले.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीड हादरलं! विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार; पाईप आणि चप्पलने मारहाणही केली