एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी झाल्यावरच आमचा समाधानाचा दिवस, संतोष देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनी बंधू धनंजय देशमुख भावूक

Santosh Deshmukh Case : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Case Update) आज (29 नोव्हेंबर 2025) एक वर्ष झाले आहे.

बीड : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Case Update) आज (29 नोव्हेंबर 2025) एक वर्ष झाले आहे. दरम्यान, देशमुख कुटुंबाचा आणि मस्साजोग ग्रामस्थांचा न्यायाचा लढा आजही सुरू आहे. या प्रकरणातील क्रूरकर्मींना शिक्षा झाली पाहिजे, हा आमचा एकच उद्देश असल्याची माहिती दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी दिलीये.ही गुन्हेगारी (Santosh Deshmukh Murder Case) संपवणार असल्याचा शब्द आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचेही ते म्हणाले आहेत. प्रथम पुण्यस्मरण निमित्त आज मस्साजोग येथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले

Dhananjay Deshmukh : फाशीची शिक्षा भेटल्यावरच आमचा समाधानाचा दिवस

पहिल्या दिवसापासून जो आमचा न्यायाचा लढा सुरू आहे तो अद्यापही आहे. क्रूरकर्मी लोकांना शिक्षा झाली पाहिजे, हा एकच आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही गावकरी आणि कुटुंबीय लढत आहोत. ज्यांनी वाईट कर्म केले यातला माझ्या भावाचा खून एक आहे. सगळ्या कुटुंबाला अनाथ केलं. ज्या लोकांनी निष्पाप भावाला संपवलं त्यांना फाशीची शिक्षा भेटल्यावर आमचा समाधानाचा दिवस असेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलीये. दरम्यान, या प्रकरणात चार्जफ्रेम व्हायला वेळ लागत आहे. वेळ काढू पण केला जात आहे, परंतु 12 डिसेंबरला चार्ज फ्रेम होईल. लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे, असे आमचे प्रयत्न असतील. असेही ते म्हणाले.

Santosh Deshmukh Murder Case : फोटो व्हायरल झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास

भाऊ असताना आम्ही ज्या-ज्या गोष्टी करायचो त्या आम्ही करत आहोत. मी त्यांचा भाऊ असणं निमित्त आहे. आम्हाला लढण्याचं बळ गावापासून मिळालंय. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते पाठीशी आहेत. मनोज जरांगे यांना आम्ही आमच्या अडचणी वेळोवेळी सांगतो सर्व समाजातील लोक आमच्या सोबत आहेत. त्यांच्या आठवणीत आम्ही सामाजिक कार्य करत आहोत. आम्ही कधी खचलो नाहीत, त्यांच्या आठवणीमध्ये जलसंधारणाचे काम केले, रक्तदान शिबिर घेतले. समाजकार्य करण्याची इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती आम्हाला गावाने दिली. मागच्या वर्षी आमच्याकडे प्रत्येक सणाची भयानक आठवणी होत्या. मागच्या वर्षीचे प्रत्येक सणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. दादाची कुठलीच आठवण आम्ही विसरू शकत नाही. आम्ही गावात सलोख्याने, एकोप्याने राहत होतो. गावची ताकद तुम्ही चौथा स्तंभ म्हणून सिद्ध झालाय. आज वर्षश्राद्धा निमित्त समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन आज ठेवण्यात आलेले आहे. अशी माहिती बंधू धनंजय देशमुख यांनी दिली.

Dhananjay Deshmukh : गरज पडली तर गाव आणि मी स्वतः भाऊ म्हणून कुठलीही गोष्ट करायला तयार

नदी खोलीकरणाचे काम झाले आहे. सह्याद्री देवराई मार्फत झाडे लावली आहेत. या कामाच्या मार्फत समाजकार्य नेहमी आम्ही करणार आहोत. आम्ही दुःखाला चांगले कामे कसे असतात ते दाखवून देणार आहोत. कृष्णा आंधळेच्या तपासाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तपास यंत्रणांना त्याच्या गेल्या तीन महिन्यातल्या तपासा बाबतची माहिती त्यांनी मागवली आहे, सूचना दिली आहे.

मी जे जे आंदोलन केले त्याचा परिणाम म्हणजे या प्रकरणातील आरोपी 11 महिन्यापासून जेल बंद आहेत. आता त्यांच्यावर 12 डिसेंबर रोजी आरोप निश्चिती होईल. हे प्रकरण लवकर कोर्टात चालावे असे आमचे प्रयत्न आहेत. कोर्टाने देखील तसे संकेत दिले आहेत. या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होणार आहे. ही गुन्हेगारी संपणार असल्याचे शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला होता. यावरही काही करायची गरज पडली तर गाव आणि मी स्वतः भाऊ म्हणून कुठलीही गोष्ट करायला तयार आहोत. असेही बंधू धनंजय देशमुख म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sarva Pitri Amavasya 2026: सर्वपित्री अमावस्या...पितरांची मुक्ती अन् श्राद्धासाठी 'ही' वेळ सर्वात योग्य! एकाच दिवशी सर्व पितरांचे स्मरण, ही संधी सोडू नका, धार्मिक महत्त्व..
सर्वपित्री अमावस्या...पितरांची मुक्ती अन् श्राद्धासाठी 'ही' वेळ सर्वात योग्य! एकाच दिवशी सर्व पितरांचे स्मरण, ही संधी सोडू नका, धार्मिक महत्त्व..
Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही च्रकावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही च्रकावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget