Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू
Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर जोरादार धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
![Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू Beed Pickup-container head-on collision near Manjarsumba 5 people died on the spot Beed News Marathi news Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/ce767e5c5218f8c77e300e7ab18640d91705078718590924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर जोरादार धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रल्हाद सिताराम घरत (वय 63, रा.महाजनवाडी ता.जि.बीड), नितिन प्रल्हाद घरत (41, रा.महाजनवाडी ता जि.बीड), विनोद लक्ष्मण सानप (41, रा.वाघिरा ता.पाटोदा जि.बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय कंटेनरमध्ये मृ्त्यू झालेल्या दोघांची नावे समजू शकलेली नाहीत.
अधिकची माहिती अशी की, ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपचा समोरा समोर अपघात झाला. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या गाड्यामधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृत्यू झालेले लोक महाजनवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)