Yamaha Offers: गणेशोत्सवादरम्यान दुचाकी घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण; यामाहा देतेय आकर्षक ऑफर्स, कॅशबॅकही उपलब्ध
Yamaha Ganpati Festival Offers: यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान यामाहा कंपनी आपल्या गाड्यांवर आकर्षक ऑफर्स देत आहे. या ऑफर्स काय आहेत आणि किती तारखेपर्यंत आहे? हे जाणून घेऊया.
Yamaha Offers: सणासुदीच्या काळात अनेक ऑफर्स (Festive Offers) सुरू असतात, अशातच दुचाकी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करण्यासाठी यामाहा मोटार इंडियाने (Yamaha Motor India) विशेष ऑफर्स आणल्या आहेत. या अंतर्गत तुम्हाला विशेष कॅशबॅक आणि फायनान्स ऑफर्स (Yamaha Offers) मिळणार आहेत. या ऑफर्समुळे तुम्हाला स्वस्तात दुचाकी विकत घेण्याची संधी आहे. यामाहाच्या विशेष ऑफर्स 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध असणार आहेत.
कोणत्या दुचाकींवर आहेत ऑफर्स?
विशेष कॅशबॅक आणि फायनान्स ऑफर्स सध्या मुंबईमध्ये यामाहाच्या 150 सीसी एफझेड मॉडेल रेंज (Yamaha fz) आणि यामाहा रे झेडआर 125 सीसी फाय हायब्रिड (Yamaha Ray ZR Hybrid 125cc) स्कूटरवर उपलब्ध आहे.
तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये यामाहाची 150 सीसी एफझेड मॉडेल (Yamaha 150cc fz) आणि फॅसिनो 125 सीसी हायब्रिड (Yamaha Fascino 125cc Hybrid) स्कूटरवर उपलब्ध आहे.
काय आहेत ऑफर्स?
वर उल्लेख केलेल्या नवीन दुचाकींच्या खरेदीवर फ्लॅट 3,000 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. सोबतच, या गाड्यांच्या डाऊन पेमेंटवर (सुरुवातीला भरावयाची रक्कम) देखील मोठा डिस्काउंट दिला जात आहे. कमी डाऊन पेमेंट (Low Down Payment) करुन तुम्ही दुचाकी खरेदी करू शकता. सुरुवातीला केवळ 7,999 रुपये भरुन तुम्ही या गाड्या बुक करू शकता.
कमी व्याजदर उपलब्ध
तुम्ही जर कर्ज काढून दुचाकी घेत असाल, तर यामाहा यासाठी देखील विशेष ऑफर देत आहे. यामाहाच्या ऑफर अंतर्गत, केवळ 7.99 टक्के एवढ्या कमी व्याजदरावर तुम्ही नवीन दुचाकी घेऊ शकता.
या आहेत यामाहाच्या इतर गाड्या
यामाहाच्या सध्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये YZF-R15 V4 (155 सीसी), YZF-R155 V3 (155 सीसी), MT-15 V2 (155 सीसी), FZS फाय व्हर्जन 4.0 (149 सीसी), FZS-फाय व्हर्जन 3.0 (149 सीसी), FZ-फाय व्हर्जन 3.0 (149 सीसी), FZ-एक्स (149 सीसी) अशा दुचाकींचा समावेश आहे.
यामाहाच्या स्कूटर्सबद्दल बोलायचं झाल्यास, ऐरॉक्स 155 (155 सीसी), फॅसिनो 125 फाय हायब्रिड (125 सीसी), Ray ZR 125 फाय हायब्रिड (125 सीसी), रे झेडआर स्ट्रीट रॅली 125 फाय हायब्रिड (125 सीसी) या स्कूटर मॉडेल्स सध्या उपलब्ध आहेत.
दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा मोटारची (Yamaha Motor) भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी एक YZF-R15 V4 ही बाईक आहे. R15 ला भारतात मोठी मागणी आहे.
हेही वाचा: