एक्स्प्लोर

भारतात वाहनांच्या किमती सातत्याने का वाढत आहेत? जाणून घ्या यामागे काय कारण

Car Price Hikes : दोन वर्षांपूर्वी देशाला कोविड-19 महामारीचा फटका बसल्यानंतर भारतात वाहनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

Car Price Hikes : दोन वर्षांपूर्वी देशाला कोविड-19 महामारीचा फटका बसल्यानंतर भारतात वाहनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. टोयोटा इंडियाने यापूर्वी जुलैमध्ये फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा कारच्या किमती वाढवल्या होत्या. त्याचवेळी टाटा मोटर्सने 1 जुलैपासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1.5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. दुचाकींबद्दल बोलायचे झाल्यास Hero MotoCorp ने 1 जुलै रोजी बाईक आणि स्कूटरच्या किमती वाढवल्या आहेत. याशिवाय सर्व वाहन निर्मात्यांनी गेल्या दोन वर्षांत सातत्याने त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की कंपन्या असे का करत आहेत?

वाहनांच्या किमती का वाढत आहेत?

किमती वाढण्याचे पहिले कारण म्हणजे सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा आणि धातूंसह वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे पुरवठा साखळीतील निर्माण झालेले अडथळे. रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कारण दोन्ही देश वाहनांच्या पार्ट्सचे प्रमुख पुरवठादार आहेत.

लॅपटॉप, मोबाईल फोन, वॉशिंग मशिन आणि ऑटोमोबाईल्ससह इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यासाठी सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. सर्व प्रमुख अर्थव्यवस्था सेमीकंडक्टरच्या पुरवठ्याच्या मर्यादांमुळे दबावाखाली आहेत. कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊनमुळे कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली.

यामुळे लॅपटॉप आणि मोबाईल फोनसारख्या उपकरणांची मागणी वाढली. परंतु चिप्सचा पुरवठा मर्यादित होता. एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, 2020 आणि 2021 मध्ये सेमीकंडक्टरची मागणी जवळजवळ सर्व उद्योगांमध्ये महामारीपूर्व अंदाजापेक्षा जास्त होती. अहवालात सांगण्यात आले आहे की, याचा अर्थ ऑटोमोटिव्ह OEM आणि टियर-1 पुरवठादार चिप्ससाठी इतर उद्योगांमधील कंपन्यांशी वाढत्या स्पर्धा करत आहेत. तसेच लॉकडाऊन दरम्यान लोक घरातच राहिल्याने वाहनांची मागणी कमी झाली.

सेमीकंडक्टरची कमतरता कशी निर्माण झाली?

ऑटोमोबाईल कंपन्यांनी इन्व्हेंटरी खर्च कमी करण्यासाठी चिप्सच्या ऑर्डरमध्ये कपात केली. परंतु 2020 च्या अखेरीस मागणी वाढू लागली तेव्हा याची कमतरता निर्माण झाली. रशिया 25-30 टक्के पॅलेडियमचा पुरवठा करतो. जो चिप्सच्या उत्पादनातील महत्त्वाचा घटक आहे. दुसरीकडे युक्रेन जगातील 25-35 टक्के शुद्ध निऑन गॅसचा पुरवठा करतो. ज्याचा वापर चिप्स बनवण्यासाठी देखील केला जातो. युद्धामुळे पुरवठा साखळी सामान्यपणे कार्य करणे अशक्य झाले आहे. त्याचबरोबर यातील आणखी एक घटक म्हणजे तेलाच्या किमतीत झालेली वाढ.

मॅकिन्सेच्या अहवालात म्हटले आहे की, सेमीकंडक्टर्सची वाहतूक हवाई मार्गाने केली जाते आणि एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) ची किंमत वाढली हे. Consultancy Firms ने म्हटले आहे की, चिपचा तुटवडा किमान काही वर्षे कायम राहण्याची अपेक्षा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget