Volkswagen Virtus आहे देशातली सर्वात सुरक्षित कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले 5 स्टार
Volkswagen Virtus Safety Rating : जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर कारच्या सेफ्टी फीचर्ससह त्याची सेफ्टी रेटिंग ही तपासा. कारण तुम्ही खरेदी करत असलेली कार ही तुमच्या कुटुंबियांसाठी किती सेफ आहे, हे तुम्हाला या सेफ्टी रेटिंगमधून कळू शकते.
Volkswagen Virtus Safety Rating : जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर कारच्या सेफ्टी फीचर्ससह त्याची सेफ्टी रेटिंग ही तपासा. कारण तुम्ही खरेदी करत असलेली कार ही तुमच्या कुटुंबियांसाठी किती सेफ आहे, हे तुम्हाला या सेफ्टी रेटिंगमधून कळू शकते. याच कारणामुळे आता सर्व वाहन उत्पादक कारच्या सेफ्टी रेटिंगकडे लक्ष देत आहेत. यातच Volkswagen Virtus कारला NCAP क्रॅश टेस्ट दरम्यान 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
ग्लोबल एनसीएपीने भारतात कारसाठी सेफ कार्स उपक्रम सुरू केला, तेव्हा VW पोलोची क्रॅश टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर याला 0 स्टार रेटिंग मिळाली होती. याचं कारण म्हणजे याचे बेस व्हेरिएंट एअरबॅगशिवाय येत होते. यानंतर VW पोलो मॉडेलमध्ये 2-एअरबॅग जोडून याला अपडेट करण्यात आले आहे. अलीकडे VW Taigun आणि Skoda Kushaq ला GNCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. याच क्रमात Volkswagen च्या Virtus ची लॅटिन एनसीएपीद्वारे क्रॅश टेस्ट देखील केली गेली. ज्या दरम्यान त्याला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे.
लॅटिन एनसीएपीने फ्रंट ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्ट 64 किमी/ताशी, साइड मोबाइल बॅरियर टेस्ट 50 किमी/ताशी, साइड पोल इम्पॅक्ट टेस्ट 29 किमी/ताशी टेस्ट घेण्यात आली. ज्यामध्ये चालक आणि प्रवाशांच्या डोक्याला आणि मानेला दिलेली सुरक्षा बऱ्यापैकी असल्याचे दिसून आले. गाडी चालवताना चालकाच्या चेस्टला पुरेसे संरक्षण मिळाले आणि प्रवाशाला चांगले चेस्टला संरक्षण मिळाले. चालक आणि प्रवासी दोघांच्याही गुडघ्याजवळ उत्तम सुरक्षा दिसली. AEB सिटी टस्ट दाखवते की, कार AEB सिटी लॅटिन NCAP तंत्रज्ञानाची आवश्यकता पूर्ण करते. रेस्क्यू शीट लॅटिन NCAP नियमांची पूर्तता करते. विशेष म्हणजे ADAS फीचर भारतातील Virtus मध्ये उपलब्ध नाही.
दरम्यान, भारतात Volkswagen Virtus दोन इंजिन पर्यायांसह येते. ज्यामध्ये पहिले 1.0L, 3-सिलेंडर TSI टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे 115bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दुसरा पर्याय म्हणून 1.5L, 4-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 150bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक (फक्त 1.5L पेट्रोल प्रकारासाठी) समाविष्ट आहे. सेफ्टी फीचर्समध्ये यात 6 एअरबॅग्ज मिळतात, ज्यात ड्रायव्हर, फ्रंट पॅसेंजर, 2 पडदे, ड्रायव्हर साइड, फ्रंट पॅसेंजर साइड कव्हर होते. इतर फीचर्समध्ये सीट बेल्ट वॉर्निंग, ओव्हरस्पीड वॉर्निंग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, अँटी थेफ्ट इंजिन इमोबिलायझर, मिडल रिअर थ्री-पॉइंट सीटबेल्ट, फ्लॅशिंग इमर्जन्सी ब्रेक लाईट, सेंट्रल लॉकिंग इत्यादींचा समावेश आहे.