(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Car Under 4 Lakh: फक्त चार लाखात घरी घेऊन जा 'या' कार, फीचर्ससोबत मायलेजही आहे जबरदस्त
Cheapest Car In India: भारतात बजेट कारची सर्वाधिक विक्री होते. कारण या गाड्या लोकांच्या बजेटमध्येच येतात असे नाही तर मायलेजच्या बाबतीतही या गाड्या उत्तम कामगिरी करतात.
Cheapest Car In India: अनेक लोकांची कार घेण्याची इच्छा असते. मात्र कमी बजट अनेक लोक कार घेण्याचं टाळतात. जर तुमचाही बजट कमी आहे आणि तुम्ही चांगले फीचर्स असलेले कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात बजेट कारची सर्वाधिक विक्री होते. कारण या गाड्या लोकांच्या बजेटमध्येच येतात असे नाही तर मायलेजच्या बाबतीतही या गाड्या उत्तम कामगिरी करतात. अशाच काही कारबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.
मारुती अल्टो 800
ही कार देशातील सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. किंमत आणि फीचर्समुळे या कारला मोठी मागणी आहे. तुम्ही ही कार 3,39000 रुपयाच्या (एक्स-शोरूम) प्रारंभिक किमतीत तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. तुम्हाला या कारमध्ये पाच प्रकारांचा पर्याय देखील मिळतो, ज्यामध्ये स्टॅंडर्ड मॉडेल सर्वात परवडणारे आहे. मायलेजच्या बाबतीत ही स्वस्त कार मोठ्या आणि महागड्या कारलाही मागे टाकते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार पेट्रोल इंजिनवर 22.05 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच सुरक्षेसाठी तुमच्याकडे कारमध्ये दोन एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एबीएस आणि ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत. या कारमध्ये तुम्हाला CNG चा पर्याय देखील मिळेल.
अल्टो K10
मारुती अल्टो 800 नंतर ग्राहकांना ही कार खूप आवडते. नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन K10 कारची प्रारंभिक किंमत 3.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही कार एकूण सहा प्रकारांसह (स्टँडर्ड, LXi, VXi, VXi Plus, VXi AGS आणि VXi Plus AGS) बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला 998cc पेट्रोल इंजिन मिळते. जे 24.39 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या कारच्या सर्वात स्वस्त व्हेरियंटमध्ये रियर डोअर चाइल्ड लॉक, हाय स्पीड अलर्ट, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS आणि EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर सारखी सुरक्षा फीचर्स देखील आहेत. याशिवाय मॅन्युअल आणि एजीएस ट्रान्समिशनचा पर्यायही कारमध्ये उपलब्ध आहे.
Datsun redi-GO
निसानची Datsun redi-GO ही सर्वात स्वस्त कारच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कारची प्रारंभिक किंमत 3.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारमध्ये ए, टी, टी ऑप्शनल, टी ऑप्शनल 1.0 एल आणि एएमटी प्रकार उपलब्ध आहेत. या कारमध्ये 800cc इंजिन, ABS, EBD, ड्रायव्हर एअरबॅग, रिअर डोअर चाइल्ड सेफ्टी लॉक, ओव्हर स्पीड वॉर्निंग, रिअर पार्किंग सेन्सर आणि बॉडी कलर बंपर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. ही कार 20.71 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.