एक्स्प्लोर

TVS Ntorq 125 रेस एडिशन मरीन ब्लू कलरमध्ये लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tvs Ntorq 125 Race Edition: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात आपल्या Ntorq 125 Race Edition ला नवीन रंग पर्यायसह लॉन्च केले आहे.

Tvs Ntorq 125 Race Edition: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात आपल्या Ntorq 125 Race Edition ला नवीन रंग पर्यायसह लॉन्च केले आहे. कंपनीनी आपली ही स्कूटर मरीन ब्लू रंगात लॉन्च केली आहे. ही स्कूटर कंपनीने ब्लॅक, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक ब्लू अशा रंग पर्यायसह सादर केली आहे. चाल तर या स्कूटर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

किंमत आणि बुकिंग 

मरीन ब्लू मधील नवीन TVS Ntorq 125 रेस एडिशनची किंमत रु.87,011 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या नवीन स्कूटरसाठी TVS मोटर कंपनीच्या संपूर्ण भारतातील अधिकृत डीलरशिपवर बुकिंग सुरू झाली आहे. स्टेल्थ विमानाच्या डिझाईनपासून प्रेरित TVS Ntorq 125 Race Edition ला सिग्नेचर LED टेल आणि हेडलॅम्प्ससह एका आक्रमक स्टाईल मिळतो. स्कूटरवर 'रेस एडिशन' बॅजिंग देखील देण्यात आली आहे. स्कूटरला स्पोर्टी स्टब मफलर, टेक्सचर्ड फ्लोअरबोर्ड या स्कूटरला अधिक आकर्षक बनवतात.

TVS NTORQ 125 Race Edition TVS SmartXonnect सह येते. जे रायडरला त्यांच्या स्मार्टफोनला स्कूटरशी जोडण्यास मदत करते. यात अनेक स्मार्ट कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहे. 60 हून अधिक फीचर्ससह सुसज्ज असलेल्या संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरद्वारे ही स्कूटर ऍक्सेस केली जाऊ शकते. मिस्ड कॉल अलर्ट, मेसेज आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखी फीचर्स याच्या डिस्प्लेवर उपलब्ध आहेत. स्कूटरमध्ये लास्ट पार्क केलेले लोकेशन असिस्ट, राइड स्टॅटिस्टिक्स आणि व्हॉईस असिस्ट सारखी फीचर्स देखील आहेत. जी 15 व्हॉईस कमांडला सपोर्ट करतात. स्कूटरला इंजिन-किल स्विच, पास-बाय स्विच आणि हाय-स्पीड अलर्ट देखील मिळतो.

TVS Ntorq 125 Race Edition मध्ये 124.8 cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 3-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड SOHC, फ्युएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे 7,000rpm वर 9.38 Bhp पीक पॉवर आणि 7,000rpm वर 10.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. रेस एडिशनचा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर फक्त 9 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडते.

फीचर्स 

TVS Ntorq 125 Race Edition मध्ये पास बाय स्विच, ड्युअल साइड स्टीयरिंग लॉक, पार्किंग ब्रेक आणि इंजिन किल स्विच यासारखी प्रमुख फीचर्स आहेत. याशिवाय स्कूटरमध्ये USB चार्जर, एक मोठा 20-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि TVS पेटंट EZ सेंटर स्टँड मिळतो. TVS Ntorq 125 22-लिटरची बूट स्पेस मिळतो. तर याचा ग्राउंड क्लीयरन्स 155 मिमी आहे. भारतीय बाजारपेठेत TVS Ntorq 125 ची स्पर्धा Suzuki Avnis 125, Yamaha RAZR, Honda Grazia 125 आणि Aprilia SXR 125 शी आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
Ladki Bahin Yojana E-KYC : नोव्हेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत, एकल महिलांबाबत मोठा निर्णय
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
Ladki Bahin Yojana E-KYC : नोव्हेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत, एकल महिलांबाबत मोठा निर्णय
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Embed widget