(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टोयोटाची हिलक्स पिक-अप लवकरच भारतात होणार दाखल, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
मोठ्या प्रमाणावर विकली जाणारी हिलक्स पिक-अप लवकरच नव्या स्वरुपात भारतात देखील दाखल होणार आहे. अतिशय मजबूत आणि आरामदायी म्हणून ही हिलक्स ओळखली जाते.
Hilux pick-up : जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर विकली जाणारी हिलक्स पिक-अप लवकरच नव्या स्वरुपात भारतात देखील दाखल होणार आहे. अतिशय मजबूत आणि आरामदायी म्हणून ही हिलक्स ओळखली जाते. लोकांच्या विश्वासार्हतेमुळे ही गाडी जगप्रसिद्ध झाली आहे. फॉर्च्युनरच्या तुलनेत हिलक्स ही ऑफ-रोड आणखी चांगली असून लवकरच टोयोटा ग्राहकांसाठी एक फर्स्ट ड्राइव्ह आवृत्ती आणणार आहे. डिझाईनचा विचार केला तर हिलक्सच्या आतील भाग हे फॉर्च्युनरपेक्षा वेगळे आहेत. शिवाय अधिक वैशिष्ट्येपूर्ण देखील आहे.
पिक-अप ट्रक बहुतेक वेळा कामाचे ट्रक म्हणूनच वापरले जातात. सध्या बरेच लोक पिक-अप ट्रकची खरेदी करत आहेत. हे टोयोटा कंपनी मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रक हिलक्स पिक अपच्या निर्मितीवर भर दिला आहे. हिलक्स ही दिसायलासुद्धा आकर्षक असल्यामुळे तिच्या विक्रीत वाढ झाली आहे. भारतातसुद्धा या पिक अपला मोठी मागणी आहे. हिलक्स ही भारतासाठी लाइफस्टाइल पिकअप असेल असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अमिरकेमध्ये हिलक्स हे एक लोकप्रिय पिक-अप आहे. तिथे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे पिक-अप उत्तम आहे. परंतू, खासगी खरेदीदारांसाठी कंपनीने हिलक्सची पुढची नवीन आवृत्ती देखील आणली आहे. भारतामध्येसुद्धा हे नवीन मॉडेलला मागणी आहे. या हिलक्सच्या डिजाइन आणि बाकीच्या इतर गोष्टींमध्ये सुधारणा केल्या आहेत. मोठ्या ट्रकपेक्षा हे हिलक्स वाहन छोटे जरी असले तरी चांगल्या जीवनशैलीसाठी चांगले आहे.
नवीन हिलक्स हे फॉर्च्युनर सारख्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. परंतू ते अधिक मोठे आणि आकर्षक आहे. अमेरिकेमध्ये हिलक्स अॅडवव्हेन्चर म्हणून विकले जाते. नवीन हिलक्सचे मॉडेल हे षटकोनी लोखंडी जाळी, क्लॅडिंग आणि स्किड प्लेटसह तयार करण्यात आले आहे. ऑल-टेरेन टायर्ससह एलईडी (LED)लाईट्स आहेत. तसेच मोठी 18 इंचाची चाके आहेत. भारतात खासगी वापरासाठी डबल कॅब आवृत्ती देखील मिळणार आहे.
पूर्वीच्या हिलक्सच्या तुलनेत, ही नवीन हिलक्स खूपच आलिशान आहे. फॉर्च्युनरसारखीच सुसज्ज आहे. नवीन फॉर्च्युनरप्रमाणेच, 8 इंच टचस्क्रीनसह एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. तुम्हाला हवामान नियंत्रण, मागील दृश्य कॅमेरा, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक काळातील विविध वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. 9-स्पीकरसह जेबीएल (JBL)ऑडिओ सिस्टमसारखी सामग्री आहे. यामध्ये पाच प्रवाशी बसतील एवढी जागासुध्दा आहे. अमेरिकेमध्ये, हिलक्स मोठ्या V6 पेट्रोल इंजिनसह येते. ती भारतात येत नाही. व्यावसायिक आवृत्ती ही 2.4l डिझेलसह येते. भारतासाठी हिलक्स गिअरबॉक्स पर्यायांसह अपेक्षितपणे टॉप-एंडसाठी 2.4l डिझेल आणि 2.8l सह मिळणार आहे. फॉर्च्युनरपेक्षा हिलक्स चांगली आहे. ड्रायव्हींगसाठी हिलक्स उत्तम असल्याचेही सांगण्यात आले आहे. पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये हिलक्स भारताला मिळेल असे सांगण्यात आले आहे. टॉप आवृत्तीसाठी 38 लाख रुपयापर्यंतची किंमत मोजावी लागणार आहे. व्ही-क्रॉसच्या तुलनेत हिलक्स अधिक महाग आहे. परंतू, ही अधिक आधुनिक आणि अधिक सुसज्ज आहे.