Toyota Hilux pick-up : टोयोटाचे नव्या लूकमधील हिलक्स पिक-अप फेब्रुवारी 2022 मध्ये होणार लाँच
फॉर्च्युनरच्या तुलनेत हिलक्स ही ऑफ-रोड आणखी चांगली असून लवकरच टोयोटा ग्राहकांसाठी एक फर्स्ट ड्राइव्ह आवृत्ती आणणार आहे.
मुंबई : टोयोटा (Toyota) 2022 मध्ये भारतात नव्या लूकसह हिलक्स पिक-अप (Hilux pick-up ) लाँच करणार आहे. हिलक्स ही फॉर्च्युनर( Fortuner) एसयूव्हीची भारतात विकली जाणारी पिक-अप ट्रक आवृत्ती आहे. पिक-अप आवृत्तीची ही नवीन दुहेरी कॅब असून या आवृत्तीची फॉर्च्युनरच्या तुलनेत वेगळी स्टाइलिश थीम असेल. ही आवृत्ती वेगळ्या लूकमध्ये असून ती मोठी आहे. आधीच्या हिलक्स पिक-अपच्या तुलनेत नव्या आवृत्तीमध्ये एलईडी हेडलॅम्प्स आहेत.
नव्या हिलक्स पिक-अपमध्ये नवीन 18 इंचाचे मिश्र धातू आहेत. डिझाईनच्या दृष्टीकोणातून विचार केला तर या आवृत्तीतील पिक-अप जास्त मोठे असून त्याचा लूक आकर्षक आहे. फॉर्च्युनरसारखेच त्याचे वेगवेगळे लूक बणवणार आहे. शिवाय ही आवृत्ती सीबीयू असल्याने हिलक्स फॉर्च्युनर प्रमाणेच टॉप-एंड 2.8 लीटर टर्बो डिझेल इंजिनचा समावेश आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ऑफरवर असेल.
ही नवी आवृत्ती फॉर्च्युनर आधारित हार्डस्कोअर ऑफ-रोडर आहे. त्यामुळे ती शिडी-फ्रेम बांधकामासह येते आणि 4x4 हे टॉप-एंड पूर्णपणे लोड केलेल्या हिलक्ससाठी उत्तम असेल. हिलक्समध्ये वेगळ्याप्रकारचे एक नवीन स्वयंचलित मर्यादित-स्लिप भिन्नता आहे.
फॉर्च्युनरच्या तुलनेत हिलक्स ही ऑफ-रोड आणखी चांगली असून लवकरच टोयोटा ग्राहकांसाठी एक फर्स्ट ड्राइव्ह आवृत्ती आणणार आहे. झिझाईनचा विचार केला तर हिलक्सच्या आतील भाग हे फॉर्च्युनरपेक्षा वेगळे आहेत. शिवाय अधिक लक्झली वैशिष्ट्ये देखील आहेत.
नव्या आवृत्तीमध्ये आठ इंच टचस्क्रीसह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, एलईडी दिवे, JBL प्रीमियम ऑडिओ सिस्टम आहे. टोयोटोच्या मते या आवृत्तीसाठी किमतीचा प्रश्न मोठा आहे. परंतु, भारतात बहुतेक सीबीयूचे काही प्रकार पूर्ण लोड केलेल्या ट्रिमसह येतील. त्यामुळे व्हि-क्रॉसपेक्षा हिलक्सची किंमत 35 लाख रूपयांनी जास्त असेल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या:
माती खाल्ली अन् सवय लागली! लोकांना माती खाण्याचं व्यसन; मोठ्या प्रमाणात होतेय विक्री, काय आहे प्रकार?
ऑक्सिजनवरुन राजकारण, राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृतांची आकडेवारी दिली नाही; केंद्राचा राज्यांवर निशाणा