Upcoming Electric Cars: लवकरच लॉन्च होणार 'या' आधुनिक इलेक्ट्रिक कार्स; पाहा संपूर्ण लिस्ट
Upcoming New Electric Cars: अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. यातच लवकरच नवीन इलेक्ट्रिक कार भारतात एंट्री घेणार आहेत, चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या अपकमिंग इलेक्ट्रिक कार्स...
Upcoming New Electric Cars: अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. सध्या देशातील सुमारे 85 टक्के इलेक्ट्रिक कारमध्ये टाटा मोटर्सचा वाटा आहे. यातच लवकरच नवीन इलेक्ट्रिक कार भारतात एंट्री घेणार आहेत, चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या अपकमिंग इलेक्ट्रिक कार्स...
Upcoming New Electric Cars: एमजी कॉमेट
एमजी मोटर इंडिया एप्रिल 2023 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार कॉमेट लॉन्च करणार आहे. ही 2-डोअर असलेली इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात लहान कार असेल, ज्याची लांबी केवळ 2.9 मीटर आहे. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. यात 17.3kWh आणि 26.7kWh बॅटरी पॅक मिळेल, ज्याची रेंज अनुक्रमे 200 आणि 300 किमी असेल.
Upcoming New Electric Cars: टाटा पंच इलेक्ट्रिक कार
टाटा मोटर्स 2023 च्या अखेरीस त्यांच्या मायक्रो एसयूव्ही पंचची इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करणार आहे. ही कार जनरल 2 सिग्मा प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. या मिनी इलेक्ट्रिक SUV ला दोन बॅटरी पॅकचा पर्याय मिळेल, ज्यामध्ये Tiago EV सह 26kWh बॅटरी पॅक आणि Nexon EV सह 30.2kWh बॅटरी पॅक समाविष्ट आहे.
Upcoming New Electric Cars: टाटा कर्व
Tata Motors पुढील वर्षी आपली Curve SUV इलेक्ट्रिक आणि ICE पॉवरट्रेनसह लॉन्च करेल. ही कार Gen 2 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. ही कार प्रति चार्ज 400 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळवू शकते. ही कार MG ZS EV, Hyundai Kona Electric आणि Mahindra XUV400 सारख्या कारला टक्कर देईल.
Upcoming New Electric Cars: महिंद्रा XUV E8
2022 मध्ये महिंद्राने INGLO बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित आपल्या 5 कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV कार प्रदर्शित केल्या. ही XUV आणि BE ब्रँड अंतर्गत विकले जातील. या सीरीजमधील पहिली XUV.e8 डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च केली जाईल. 80kWh पर्यंत बॅटरी पॅक असलेली ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम त्यात दिसू शकते.
Upcoming New Electric Cars: BYD सील
BYD ने 2023 ऑटो एक्सपोमध्ये सील इलेक्ट्रिक सेडानचे प्रदर्शन केले. ही इलेक्ट्रिक सेडान यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत जवळपास 70 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही 61.4kWh आणि 82.5kWh च्या दोन बॅटरी पॅकच्या पर्यायासह लॉन्च केली जाऊ शकते. ज्यामध्ये अनुक्रमे 550km आणि 700km ची रेंज मिळण्याची शक्यता आहे.