एक्स्प्लोर

Cars With ADAS: ए़डीएएस सेफ्टी फीचर्ससह येतात 'या' कार्स, पाहा संपूर्ण लिस्ट

Car Safety Features: सध्या वाहन उत्पादक कंपनी आपल्या कारच्या सेफ्टी फीचर्सकडे विशेष लक्ष देत आहेत. यासाठी अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम म्हणजेच ADAS वाहनांमध्ये उपलब्ध होऊ लागली आहे.

Car Safety Features: सध्या वाहन उत्पादक कंपनी आपल्या कारच्या सेफ्टी फीचर्सकडे विशेष लक्ष देत आहेत. यासाठी अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम म्हणजेच ADAS वाहनांमध्ये उपलब्ध होऊ लागली आहे. हे एक अतिशय आधुनिक तंत्रज्ञान आहे, जे अनेक सॉफ्टवेअरसह कार्य करते. याच्या मदतीने कारचे कॅमेरे, रडार आणि इतर सेन्सर्स आपोआप कनेक्ट होतात. जे रस्ते अपघात रोखण्यासाठी उपयुक्त आहे. सध्या देशातील मोजक्याच वाहनांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्हालाही या सिस्टीमने सुसज्ज कार घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत.

एमजी एस्टर

लेव्हल 2 ADAS सिस्टीमने सुसज्ज असलेली ही कार आपल्या सेगमेंटमधील पहिली कार आहे. या सिस्टीममध्ये समोरच्या टक्कर अलर्ट, लेन-कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, हाय-बीम असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.32 लाख रुपये आहे.

होंडा सिटी E: HEV

होंडाच्या या हायब्रीड सेडान कारमध्ये होंडाच्या सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कारमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट, कोलेजन ब्रेकिंग सिस्टीम यासारखी सेफ्टी फीचर्स  उपलब्ध आहेत. या कारमध्ये हायब्रीड तंत्रज्ञानासह 1.5-लिटर अॅटकिन्सन-सायकल पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 19.89 लाख रुपये आहे.

एमजी ग्लोस्टर

अलीकडेच कंपनीने एमजीच्या या एसयूव्हीच्या अपडेटड व्हर्जनमध्ये ADAS चे फीचर्स समाविष्ट केले आहे. फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक अशी फीचर्स या सिस्टीममध्ये उपलब्ध आहेत. या कारमध्ये दोन प्रकारचे डिझेल इंजिन उपलब्ध आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 32 लाख रुपये आहे.

महिंद्रा XUV 700

महिंद्राने या प्रीमियम SUV मध्ये ADAS सिस्टीम दिली आहे. सेफ्टी सिस्टीममध्ये ट्रॅफिक साइन रेकग्निशन, ड्रायव्हर असिस्ट अलर्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, क्रूझ कंट्रोल, हाय-बीम असिस्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.45 लाख रुपये आहे.

MG ZS EV

या MG इलेक्ट्रिक कारमध्ये ADAS सिस्टीम देखील आहे. या कारमध्ये देण्यात आलेल्या  सिस्टममध्ये मागील क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, लेन चेंज असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन सिस्टीमसह इतर अनेक महत्त्वाच्या फीचर्सचा समावेश आहे. ही कार 22.58 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget