Mukesh Ambani Car Collection: 'या' आहेत मुकेश अंबानींच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागड्या गाड्या, पाहा संपूर्ण लिस्ट
Mukesh Ambani Car Collection: मुकेश अंबानी यांना मोठ्या व्यवसायासोबतच महागड्या वाहनांचाही शौक आहे. त्यांच्याकडे आलिशान कार्सचे मोठे कलेक्शन आहे.
Mukesh Ambani Car Collection: भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा व्यवसाय देशभर तसेच परदेशात पसरलेला आहे. अलीकडे ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र त्यांची जागा आता गौतम अदानी यांनी घेतली असून ते आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मोठ्या व्यवसायासोबतच त्यांना महागड्या वाहनांचाही शौक आहे. त्यांच्याकडे आलिशान कार्सचे मोठे कलेक्शन आहे. ज्यात अनेक महागड्या गाड्या आहेत. आज आम्ही तुम्हाला मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) 5 सर्वात महागड्या गाड्यांबद्दल सांगणार आहोत, चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार्स...
Rolls-Royce Cullinan : रोल्स रॉयस कलिनन
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या सर्वात महागड्या कारमध्ये रोल्स रॉयस कलिनन पहिल्या क्रमांकावर आहे. जी त्यांना खूप आवडते. या कारची किंमत जवळपास 13 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला त्यांनी ही कार खरेदी केली होती.
Rolls-Royce Phantom Drophead Coupe : रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप
मुकेश अंबानी यांच्या कारच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी कार म्हणजे रोल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूप, जी त्यांनी खूप पूर्वी खरेदी केली होती. या कारची किंमत सुमारे 13 कोटी रुपये आहे. या कारमध्ये अनेक फीचर्ससह उत्तम लूक मिळतो.
मर्सिडीज-मेबॅच बेंझ S660 गार्ड
मुकेश अंबानींच्या महागड्या आणि आलिशान कारच्या लिस्टमध्ये मर्सिडीज मेबॅच बेंझ एस660 गार्ड या अत्यंत लक्झरी कारचाही समावेश आहे. त्यांच्या या कारची बाजारातील किंमत 10 कोटींहून अधिक आहे.
BMW 760 Li High Security
मुकेश अंबानींच्या सर्वात सुरक्षित कार म्हणून अनेक बुलेटप्रूफ कार देखील आहेत. त्याच्यासोबत एक BMW 760Li सिक्युरिटी (आर्मर्ड) कार देखील उपलब्ध आहे. ही बुलेटप्रूफ कार आहे. या कारची बाजारातील किंमत सुमारे 8.50 कोटी रुपये आहे.
Ferrari SF90 Stradale
मुकेश अंबानी यांच्या सर्वात महागड्या कारमध्ये पाचव्या क्रमांकावर फेरारी SF90 Stradale आहे. ही एक हायब्रिड स्पोर्ट्स मॉडेल आहे, जे त्यांनी 2019 मध्ये विकत घेतले होते. फेरारीची ही पहिली हायब्रिड कार आहे. बाजारात या कारची किंमत सुमारे 7.50 कोटी रुपये आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: