एक्स्प्लोर

Tesla CyberTruck: टेस्ला घेऊन येत आहे इलेक्ट्रिक 'सायबर ट्रक', 2023 मध्ये होणार लॉन्च?

Tesla CyberTruck : आपल्या इलेक्ट्रिक कारची जगभरात प्रसिद्ध असलेली टेस्ला कंपनी लवकरच एक 'सायबर ट्रक' (Cybertruck) लॉन्च करणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 2023 च्या शेवटी मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन सुरु करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Tesla CyberTruck : आपल्या इलेक्ट्रिक कारची जगभरात प्रसिद्ध असलेली टेस्ला कंपनी लवकरच एक 'सायबर ट्रक' (Cybertruck) लॉन्च करणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 2023 च्या शेवटी मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन सुरु करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. इलॉन मस्क यांनी 2019 मध्ये या बहुप्रतीक्षित ट्रक्सची घोषणा केली होती. मात्र 2019 जगभरात ओढवलेल्या कोरोना संकटामुळे याचे उत्पादन लांबणीवर गेले असून अद्यापही हा पिकअप ट्रक लॉन्च करण्यात आलेला नाही. 

आपल्या या सायबर ट्रकबद्दल मागील महिन्यात टेस्लाचे सांगितले होते की, कंपनी 2023 च्या मध्यापासून नवीन मॉडेलचे उत्पादन सुरु करण्यासाठी ऑस्टिन, टेक्सास प्लांट तयार करण्यासाठी काम करत आहे. याबाबत मस्क म्हणाले होते की, आम्ही सायबर ट्र्क उत्पादन करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत.   

टेस्लाने हा ट्रक लॉन्च करण्याआधी याची बुकिंग देखील सुरु केली होती. अनेक ग्राहकांनी 100 डॉलर्स भरून हा ट्र्क बुक केला आहे. मात्र आता टेस्लाने उत्तर अमेरिकेबाहेर सायबर ट्रकची ऑर्डर घेणे बंद केले आहे. मे महिन्यात कंपनीने सांगितले की, उत्पादन सुरु केल्यानंतर आधीपासून कंपनीकडे असलेले ऑर्डर्स पुढील 3 वर्षात पूर्ण करू.'' असं असलं तरी कंपनीने या कारची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. 2019 च्या मीडिया रिपोर्टनुसार कंपनी या कारची किंमत 40 हजार डॉलर्स इतकी ठेवणार होती. मात्र आता इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी आणि उत्पादन पाहता कंपनी याची किंमत यापेक्षा अधिक ठेवू शकते. 

दरम्यान, इलॉन मस्क यांनी 2019 मध्ये हा इलेक्ट्रिक पिकअप ट्रक जगासमोर सादर केला होता. यानंतर टेस्लाने ऑगस्ट 2021 मध्ये घोषित केले की, या इलेक्ट्रिक पिकअप ट्रकचे 2022 पर्यंत उत्पादन सुरु होई. याच दरम्यान, याचे प्रतिस्पर्धी Rivian, Ford आणि GM यांनी  R1T, F-150 Lightning आणि Hummer EV लॉन्च केले आहे. फोर्डने 2023 मध्ये 150,000 F-150 लाइटनिंग मॉडेल्सचे उत्पादन करण्याचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, सायबर ट्रक अतिशय फ्यूचरिस्टिक दिसते आणि याची डिझाइन ब्लेड रनर आणि मॅड मॅक्स सारख्या चित्रपटांपासून प्रेरित असल्याचे दिसते. टेस्ला आता या ट्रकचे डिझाइन अशा प्रकारे विकसित करत आहे की, हे वाहन स्त्यावर चालवणे अधिक सुरक्षित होईल.

इतर महत्वाची बातमी: 

Ola S1 Air vs Honda Activa: कोणती स्कूटर आहे बेस्ट? जाणून घ्या दोघांच्या किंमतमधील फरक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | केंद्रीय वखार महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती | 16 Dec 2024 |  ABP MajhaChandrashekhar Bawankule : भुजबळांना महायुतीत चांगलं स्थान मिळेल, बावनकुळेंचं मोठं वक्तव्यZero Hour :  आक्रमक भुजबळ पुढं काय करणार? राहणार की राष्ट्रवादीतून बाहेर पडणार?Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Embed widget