भारतीय कार बाजारात टाटा नेक्सॉनचा दबदबा! सप्टेंबरमध्ये विक्रीत पहिला क्रमांक, एडीएएससह अपग्रेडेड सेफ्टी, किंमत किती?
हे यश साजरे करण्यासाठी कंपनीने Red #Dark Edition सादर केला आहे, जो पेट्रोल, डिझेल आणि CNG या तीनही पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असून, किंमत ₹12.44 लाखांपासून सुरू होते.

Mumbai: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स (TMPV), भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल निर्माता कंपनीने त्यांच्या नेक्सॉन लाइनअपमध्ये अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS) चा समावेश केल्याची घोषणा केली आहे. भारतातील सेफ्टी क्रांतीत आघाडीवर असलेली नेक्सॉन ही 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी पहिली कार असून, GNCAP आणि BNCAP या दोन्ही संस्थांकडून 5-स्टार रेटिंग मिळवणारी एकमेव SUV आहे. ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन किप असिस्ट, ट्रॅफिक साइन रेकग्निशन अशी एडीएएस वैशिष्ट्यं समाविष्ट करून नेक्सॉनने सुरक्षिततेचा स्तर आणखी उंचावला आहे. सप्टेंबर महिन्यात नेक्सॉन भारतातील नंबर 1 विक्री होणारी कार ठरली असून, हा टाटा मोटर्ससाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश साजरे करण्यासाठी कंपनीने Red #Dark Edition सादर केला आहे, जो पेट्रोल, डिझेल आणि CNG या तीनही पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असून, किंमत ₹12.44 लाखांपासून सुरू होते.
सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “2017 मध्ये पदार्पण केल्यापासून नेक्सॉनने आकर्षक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेच्या मापदंडात SUV श्रेणीला नवा आयाम दिला आहे. भारतातील सुरक्षिततेची दिशा बदलणारी पहिली कार म्हणून नेक्सॉनने वेईकल सेफ्टीमध्ये नवे मानदंड निर्माण केले आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरून ग्राहकांचा विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या यशाचं औचित्य साधत आम्ही Red #Dark Edition लाँच करत आहोत आणि प्रगत तंत्रज्ञानासह नेक्सॉन पोर्टफोलिओ अधिक समृद्ध करत आहोत. विस्तृत पॉवरट्रेन पर्याय, उत्कृष्ट वैशिष्ट्यं आणि आकर्षक लुकमुळे नेक्सॉन आज प्रत्येक भारतीय ग्राहकाची पहिली पसंती ठरत आहे. अलीकडच्या GST सुधारणा या वाहनाच्या मूल्यधारणेला अधिक बळकटी देतात आणि आमचं उद्दिष्ट प्रगती, कार्यक्षमता आणि भारतीय ग्राहकांच्या आकांक्षांना पूर्तता करणारी उत्पादने देणं हेच राहील.”
एडीएएस सेफ्टी टेकबाबत..
नेक्सॉनमध्ये आधुनिक सेफ्टी सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे, जी ड्रायव्हरला माहिती देऊन प्रतिसाद वेळ सुधारते आणि अपघात टाळण्यास मदत करते, ज्यामुळे प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित होतो.
प्रमुख एडीएएस वैशिष्ट्ये:
• Forward Collision Warning (FCW): समोरच्या संभाव्य धडकेबाबत ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट देते.
• Autonomous Emergency Braking (AEB): ड्रायव्हरने वेळेत प्रतिक्रिया दिली नाही तर आपोआप ब्रेक लावते.
• Lane Departure Warning (LDW): वाहन नकळतपणे लेन बदलल्यास सूचित करते.
• Lane Centering System (LCS): वाहन योग्य लेनमध्ये ठेवते.
• Lane Keep Assist (LKA): लेन शिस्त राखण्यासाठी स्टिअरिंग सहाय्य करते.
• High Beam Assist (HBA): रात्री स्पष्ट दृश्यमानतेसाठी हेडलाइट्स स्वयंचलितपणे समायोजित करते.
• Traffic Sign Recognition (TSR): रस्त्यावरील चिन्हे ओळखून ड्रायव्हरला माहिती दाखवते.
नेक्सॉन Red #Dark Edition:
हा एडिशन खास लाल अॅसेंट्स, आकर्षक यूजर इंटरफेस आणि प्रीमियम इन्फोटेनमेंट अनुभवासह नेक्सॉनला अधिक स्टायलिश बनवतो. पेट्रोल, डिझेल आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला Red #Dark Edition Atlas Black रंगात सजलेला आहे. यात #Dark मॅस्कॉटसह लाल लेटरिंग, पियानो ब्लॅक ग्रिल सराउंड, रूफ रेल्स आणि स्किड प्लेट्स देण्यात आल्या आहेत.
आतील भागात Granite Black केबिनसोबत लाल लेदरट हवेशीर फ्रंट सीट्स, डायमंड क्विल्टिंग, रेड स्टिचिंग, तसेच डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोलवर रेड अॅसेंट्स देण्यात आले आहेत. प्रीमियम फिनिशेस आणि रियर सनशेड प्रवासाचा आराम अधिक वाढवतात.
























