एक्स्प्लोर

Tata Curvv EV : टाटा मोटर्सने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक  SUV, 17.49 लाखांपासून किंमत; जाणून घ्या 7 व्हेरियंट आणि वैशिष्ट्ये

Tata Motors ने Tata Curvv ची इलेक्ट्रिक व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केली असून ती सात व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील.  

Tata Curvv EV : टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लॉन्च केली आहे. टाटाची ही एसयूव्ही कार सिग्नेचर व्हर्च्युअल सनराइज पेंट स्कीममध्ये डिझाइन केलेली पहिली बजेट कूप एसयूव्ही असणार आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 17.49  लाखांपासून सुरू होते ते 21.99 लाखांपर्यंत असेल. जाणून घेऊयात त्याची वैशिष्ट्ये, 

585 किमीची जबरदस्त रेंज

Tata Curve EV दोन बॅटरी पर्यायांसह आणण्यात आले आहे. SUV मध्ये 45 kWh आणि 55kWh क्षमतेचे बॅटरी पर्याय आहेत. ज्यामध्ये लाँग रेंज व्हेरिएंटला फुल चार्जमध्ये 585 किलोमीटर एआरएआय रेंज मिळते. आणि 45 kWh बॅटरीसह ती 502 किमी एआरएआय रेंज मिळते. 70kW क्षमतेच्या चार्जरसह, 10 ते 80 टक्के चार्ज फक्त 40 मिनिटांत होऊ शकतो. SUV केवळ 15 मिनिटांत 150 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.

शानदार फीचर्सनी सज्ज 

18 इंच व्हिल्सव्यतिरिक्त, एसयूव्हीमध्ये 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 450 मिमी वॉटर वेडिंग क्षमता, फ्लश डोअर हँडल, 500 लिटर बूट स्पेस, कनेक्ट केलेले ॲप्स, एलईडी लाइट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स, ॲम्बियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर टेलगेट आहे. स्टार्टर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

लेव्हल-2 ADAS चाही समावेश

Tata Curve EV अतिशय सेफ्टी बनवण्यात आले आहे. याशिवाय यात अशी अनेक वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत जी प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. याशिवाय यात थ्री पॉइंट ईएलआर सीटबेल्ट, सीटबेल्ट अँकर प्री-टेन्शनर, फोर्टिफाइड बॉडी स्ट्रक्चर, आयसोफिक्स, लेव्हल-2 एडीएएस 20 सेफ्टी फीचर्स, ईएसपी, ईपीबी, 360 सराउंड व्ह्यू, फ्रंट पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख पासून सुरु 

Tata Curve च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही त्याची प्रास्ताविक किंमत आहे, जी बदलली जाऊ शकते. त्याचा टॉप व्हेरियंट 21.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी 12 ऑगस्टपासून बुकिंग सुरू होईल आणि 14 ऑगस्टपासून टेस्ट ड्राइव्ह करता येईल. कंपनी आपले पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट 2 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे.

Tata Curvv EV चे सात व्हेरियंट

Tata Curvv EV 5 ट्रिमच्या 7 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्याची प्रास्ताविक किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरू होईल, ज्याची बुकिंग 12 ऑगस्टपासून सुरू होईल. त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 21.99 लाख रुपये आहे. या कारच्या ICE आवृत्तीची किंमत सप्टेंबर महिन्यात जाहीर केली जाईल.

  • Tata Curve EV क्रिएटिव्ह 45 kWh बॅटरी बॅक व्हेरिएंटची किंमत – 17.49 लाख रुपये
  • Tata Curve EV Complete 45 kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत – 18.49 लाख रुपये.
  • Tata Curve EV Accomplished Plus S 45 kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत – 19.29 लाख रुपये.
  • Tata Curve EV Complete 55 kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत – 19.25 लाख रुपये.
  • Tata Curve EV Accomplished Plus S 55 kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत – 19.99 लाख रुपये.
  • Tata Curve EV Empowered Plus 55 kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत – 21.25 लाख रुपये.
  • Tata Curve EV Empowered Plus A व्हेरिएंटची किंमत – 21.99 लाख रुपये.

Citroen Basalt शी टक्कर 

Citroen Basalt व्यतिरिक्त, Tata Curve भारतीय बाजारपेठेत Mahindra XUV 400, MG ZS EV सारख्या SUV बरोबर थेट स्पर्धा करेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडेAamir Khan च्या 'या' फ्लॉफ चित्रपटाचे चाहते आहेत Lord of the Rings चे 'हे' कलाकार?Lord of the Rings च्या कोणत्या कलाकाराने Priyanka Chopra सोबत केलं काम?Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
Embed widget