(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Royal Enfield Super Meteor 650 चा फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या काय आहे खास
Royal Enfield Super Meteor 650 First Look Review: भारतात Royal Enfield च्या बाईक खूप पसंत केल्या जातात. अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे.
Royal Enfield Super Meteor 650 First Look Review: भारतात Royal Enfield च्या बाईक खूप पसंत केल्या जातात. अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे. ही कंपनीची एक महत्वाची बाईक आहे. कंपनीने आपली ही बाईक EICMA 2022 मध्ये प्रदर्शित केली होती. Super Meteor 650 दोन प्रकारात येईल - Super Meteor 650 आणि Super Meteor 650 Tourer.
EICMA मध्ये प्रदर्शित केलेल्या तीन बायकांपैकी Astral Black Super Meteor 650, Solo Tourer बाईक कंपनी फिट अॅक्सेसरीज किटसह येते. ज्यात बार आणि मिरर, डिलक्स फूटपेग, सोलो फिनिशर, LED इंडिकेटर देण्यात आले आहे. तसेच Celestial Red Super Meteor 650 Tourer ला ग्रँड टूरर अॅक्सेसरीज किट मिळते. ज्यात डिलक्स टूरिंग ड्युअल-सीट, टूरिंग विंडस्क्रीन, पॅसेंजर बॅकरेस्ट, डिलक्स फूटपेग्स, लाँगहॉल पॅनियर्स, टूरिंग हँडलबार आणि LED इंडिकेटर देण्यात आले आहे. कंपनीने आपली इंटरस्टेलर ग्रीन सुपर मिटिओर 650 देखील प्रदर्शित केली होती.
Super Meteor 650 अतिशय आकर्षक दिसते आणि याची डिझाइन मस्क्यूलर आहे. तसेच यात USD फोर्क्स आणि LED हेडलॅम्प मिळतात. रॉयल एनफिल्डच्या या नवीन 650cc मॉडेलला पूर्ण प्रीमियम टच आणि फील मिळतो. याचे लहान व्हर्जन 350 Meteor सारखे असले तरी, पूर्ण एलईडी हेडलॅम्प सारख्या डिटेलिंगमुळे या बाईकला अधिक प्रीमियम लुक मिळतो. Super Meteor 650 Tourer सेलेस्टियल रेड आणि सेलेस्टियल ब्लू या दोन रंगांमध्ये येते. यामध्ये उंच फुटपेगसह एक मोठा विंडस्क्रीन आणि अधिक आरामदायक मोठी सीट देखील मिळते.
इंजिन
यात इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 सारखीच पॉवरट्रेन मिळते. जी 648cc चे ट्विन मोटर इंजिन आहे. हे इंजिन 47bhp पॉवर आणि अधिक टॉर्कसह क्रूझरसारखा राइडिंग अनुभव देते. Meteor 650 मध्ये 19/16 इंचाचे व्हील कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. सर्व रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये ही सर्वात जड आहे आणि याचे वजन 214 किलो आहे. भारतीय रस्त्यांनुसार याला किमान 135 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळू शकतो.
किती असेल किंमत?
ही बाईक रायडर मॅनिया इव्हेंटमध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर लवकरच ती पुढील वर्षी लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत सध्याच्या 650cc बाईकपेक्षा जास्त असू शकते. ही सर्वात प्रीमियम रॉयल एनफिल्ड बाईक असेल, ज्याची किंमत 4 लाखांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. एकूणच ही एक अतिशय आकर्षक बाईक आहे, जी आपल्या सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण करू शकते.