पाडव्याला चारचाकी बुकिंग करताय? क्विड, कायगर आणि ट्रायबर आता CNG मध्ये, किंमत किती?
आता कायगर, ट्रायबर, क्विड या कार सीएनजीमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सीएनजी रेट्रोफिटमेंट किटच्या उपलब्धतेची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई: रॅना इंडिया या रेनॉ ग्रुपच्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनीने कागयर, ट्रायबर आणि क्विड या आपल्या सर्व मॉडेल्समध्ये सरकार मान्यताकृत सीएनजी रेट्रोफिटमेंट किट्सच्या उपलब्धतेची घोषणा केली आहे. ग्राहक-केंद्रित आणि ग्राहकांना मन:शांती देण्याप्रती कटिबद्धता दृढ करत या सर्व सीएनजी रेट्रोफिटमेंट कार्स तीन वर्षांच्या वॉरंटीसह येतील.
आता सीएनजी रेट्रोफिटमेंट किट उपलब्ध
याबाबत रेनॉ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व कंट्री सीईओ श्री. वेंकटराम एम. यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “नाविन्यता व स्थिरतेप्रती आमची कटिबद्धता आम्हाला सतत आमच्या ऑफरिंग्जमध्ये सुधारणा करत राहण्यास प्रेरित करते. सर्व मॉडेल्समध्ये सादर करण्यात आलेल्या सरकार मान्यताकृत सीएनजी रेट्रोफिटमेंट किटमधून ग्राहकांना पर्यावरणपूरक व स्मार्ट सोल्यूशन्स देण्याप्रती आमची समर्पितता दिसून येते. आमचा विश्वास आहे की, हा उपक्रम रेनॉ कार्सना अधिक उपलब्ध होण्याजोग्या व व्यावहारिक करेल, तसेच भारतातील आमचे स्थान अधिक दृढ करेल," असे ते म्हणाले.
ऑटोमॅटिक व टर्बो व्हेरिएण्ट्स वगळता...
सीएनजी रेट्रोफिटमेंट किट ऑटोमॅटिक व टर्बो व्हेरिएण्ट्स वगळता सर्व व्हेरिएण्ट्स आणि मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे. सीएनजी किट पसंतीच्या विक्रेत्याकडून रेट्रोफिट केले जाते. त्यासाठी सुरक्षितता व कार्यक्षमता मापदंडांची पूर्तता करणाऱ्या होमोलोगेटेड किटचा वापर केला जातो. फिटमेंटचा विकास व कस्टमायझेशनमध्ये लहानात लहान हार्डवेअरकडे बारकाईने लक्ष दिले जाते.
अगोदर काही राज्यांमध्येच होणार अपलब्ध
ग्राहकांना सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव देण्याकरिता ड्रायव्हिंग कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी सीएनजी किट असलेल्या रेनॉ कारची योग्यरित्या पडताळणी करण्यात आली आहे. सीएनजी रेट्रोफिटमेंट किट टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल. हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली, गुजरात व महाराष्ट्र या पाच प्रमुख राज्यांमध्ये विक्रीला सुरूवात होईल. रेनॉने आपल्या कार्सना वैशिष्ट्य-संपन्न व स्मार्ट बनवण्यावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवले आहे. सीएनजी फिटमेंटच्या किमतीमध्ये सर्व खर्चांचा समावेश आहे. त्यासाठी ट्रायबर व कायगर या कारच्या किमतीत 69,500 रूपयांनी तर क्विड कारच्या किमतीत 75,000 रुपयांनी वाढ होईल.
हेही वाचा :
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
BLOG : ड्रायव्हिंग करताना रस्त्यावरचे वाद कसे टाळाल? 'या' 12 टिप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या
























