एक्स्प्लोर

Ratan Tata: 'इंडिका'ला 25 वर्ष पूर्ण! 'माझ्या हृदयात तुझ्यासाठी आजही आहे खास जागा', रतन टाटांनी शेअर केली भावनिक पोस्ट

Ratan Tata Celebrates 25 Years Of Tata Indica Car: नव्वदच्या दशकात टाटा मोटर्सने आपली परवडणारी हॅचबॅक टाटा इंडिका (Tata indica) ही देशातील पहिली डिझेल कार म्हणून लॉन्च केली होती. आज याच कारला भारतात लॉन्च होऊ 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.

Ratan Tata Celebrates 25 Years Of Tata Indica Car: देशाच्या वाहन क्षेत्रात काळानुरूप सातत्याने बदल होत आहेत. आज आपण रस्त्यांवर अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असलेल्या एकापेक्षा एक अशा जबरदस्त कार पाहत आहोत. मात्र देशाच्या वाहन बाजारपेठेला इथपर्यंत पोहोचण्यात अनेक मोठे संकल्प आणि चिकाटी महत्त्वाची ठरली आहे. नव्वदच्या दशकात टाटा मोटर्सने आपली परवडणारी हॅचबॅक टाटा इंडिका (Tata indica) ही देशातील पहिली डिझेल कार म्हणून लॉन्च केली होती. आज याच कारला भारतात लॉन्च होऊ 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. अशातच  उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनीही टाटा इंडिका लॉन्चच्या दिवसांची आठवण करून देणारा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 25 वर्षांपूर्वी टाटा इंडिकाने भारतात स्वदेशी प्रवासी कार उद्योगाला जन्म दिला. टाटा इंडिका (Tata indica) 1998 मध्ये लॉन्च झाली होती. डिझेल इंजिनवर चालणारी ही पहिली भारतीय हॅचबॅक कार होती. याने भारतीयांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले की, आजही ते लोकांच्या लक्षात आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्येही टाटा इंडिकाला  स्थान मिळाले आहे.
 
View this post on Instagram
 
A post shared by Ratan Tata (@ratantata)

या पोस्टसह त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये रतन टाटा (Ratan Tata) हे टाटा इंडिका (Tata indica) शेजारी उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, टाटा इंडिका लॉन्च करणे हे भारताच्या स्वदेशी प्रवासी कार उद्योगाचा जन्म होता. या आनंदाच्या आठवणी आहेत आणि माझ्या हृदयात या आठवणींना विशेष स्थान आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी ही पोस्ट शेअर केल्यापासून आतापर्यंत 37 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget