3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Sports Car : कारचं इंजिन कसेय? यामध्ये कोणते खास फिचर्स आहेत ? ही कार कधी बाजारात येणार? याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Porsche Unveiling Hybrid 911 Sports Car : जर्मनीतील लग्जरी सुपर कार तयार करणाऱ्या पोर्शे (Porsche) कंपनीने पहिल्यांदाच हायब्रिड कार आणली आहे. पोर्शेने पहिल्यांदाच हायब्रिड तंत्रज्ञानाच्या आधारावर 911 कार तयार केली असून आज त्याचे अनावरण झालेय. पोर्शेनं आणलेली 911 हायब्रिड कार 3 सेकंदात 100 किमी वेग पकडते. या कारचं इंजिन कसेय? यामध्ये कोणते खास फिचर्स आहेत ? ही कार कधी बाजारात येणार? याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Porsche 911 Hybrid चं अनावरण
पोर्शे कंपनीकडून 911 हायब्रिड या नव्याकोऱ्या कारचे अनावरण करण्यात आले. मागील सहा दशकांपासून पोर्शेची 911 मॉडेलची कार रस्त्यावर धावतेय. पण पहिल्यांदाच ही गाडी हायब्रिडमध्ये आणली आहे. या गाडीमध्ये 12V ची लिथियम ऑयन बॅटरी लावण्यात आली आहे. 84 लीटर क्षमता असलेले फ्यूल टँक आहे.
इंजन किती दमदार ?
पोर्शेने 911 GTS मध्ये नवीन 3.6 लीटरचा फ्लॅट सिक्स इंजन दिलेय. ज्यासोबत एक मोटरही देण्यात आली आहे. या इंजिनमधून कारला 541 हॉर्स पॉवर आणि 610 न्यूटन मीटर टॉर्क मिळते. हे इंजिन इतके वेगवान आहे की कार केवळ तीन सेकंदात ताशी 0-100 किलोमीटर वेगाने चालवता येते. या गाडीचा टॉप स्पीड 312 किलोमीटर प्रति तास इतका आहे. विशेष म्हणजे हे आधीच्या मॉडेलपेक्षा वेगाने चालवता येते.
फिचर्स कोणते आहेत ?
पोर्शेने 911 GTS मध्ये पारंपरिक एनालॉग मीटरच्या जागी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले दिलाय. त्याशिवाय एलईडी मॅट्रिक्स हेडलाइट,नंबर प्लेटखाली ADAS सेन्सर,कनेक्टिड टेल लँप,12.6 इंच कर्व्ड डिस्प्ले, 10.9 इंच सेंटर टचस्क्रीन सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, टाइप-सी पोर्ट, एंबिएंट लाइट, स्टेयरिंग व्हीलवर ड्राइव्ह मोड स्विच यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
Announced today, the new Porsche 911 introduces T-Hybrid for significantly enhanced performance. The 911 Carrera GTS is the first street-legal 911 equipped with a super-lightweight performance hybrid.https://t.co/zEUSgazvBQ pic.twitter.com/3OTQ6UAWOD
— Porsche GB (@PorscheGB) May 28, 2024
कधी होणार लाँच, किंमत किती ? -
जर्मनीच्या पोर्शे कंपनीने या हायब्रिड कारचे फक्त अनावरण केलेय. लवकरच या कारला जगभरातील बाजारपेठेत लाँच करण्यात येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार डिसेंबर 2024 अथवा जानेवारी 2025 पर्यंत लाँच करण्यात येणार आहे.
पोर्शेच्या पहिल्या हायब्रिड कारची भारतातील किंमत अंदाजे 1.86 कोटी रुपये (एक्स शो रुम) इतकी असेल, असा अंदाज आहे. पोर्शेच्या या कारची बाजारात तुलना Ferrari, Mc Laren आणि Lamborghini यासारख्या सुपर स्पोर्ट्स कारसोबत होणार आहे.