Ola Electric : Ola ग्राहकांसाठी खुशखबर! ओलाच्या 'या' स्कूटरवर मिळतेय भरघोस सूट; ऑफर 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध
Ola Discount Offers : ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स सारखे राइडिंग मोड उपलब्ध आहेत. इको मोडवर 125 किमी, नॉर्मल मोडवर 100 किमी आणि स्पोर्ट्स मोडवर 90 किमीची रेंज मिळते.
Ola Discount Offers : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी म्हणजेच Ola. ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स देशभरात अनेक ठिकाणी वापरल्या जातात. 2022 वर्ष सरत आलं आहे. याच दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना S1 Pro वर 10,000 रूपयांची सूट आणि S1 वर 4,000 चा अतिरिक्त कॅशबॅक आणि 2,000 कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
31 डिसेंबरपर्यंत ऑफर उपलब्ध
सध्या, S1 Pro आणि S1 ची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 1,25,000 रुपये आणि 97,999 रुपये आहे. मात्र, या इलेक्ट्रिक स्कूटरवर तुम्हाला 10,000 रुपयांची डिस्काऊंट ऑफर मिळतेय. तसेच, 4 हजार रूपयांची कॅशबॅक ऑफरसुद्धा 18 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही ऑफर उपलब्ध आहे. ही स्कूटर शून्य डाऊन पेमेंटवर EMI द्वारे देखील खरेदी केली जाऊ शकते.
Move OS 3 लवकरच उपलब्ध होणार
कंपनी लवकरच आपल्या ग्राहकांना आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी Moov OS 3 अपडेट जारी करणार आहे. यात हिल होल्ड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लेव्हल, साउंडट्रॅक इत्यादी वैशिष्ट्ये जोडली जातील.
ओला एस वन प्रो पॉवरट्रेन
Ola S One Pro इलेक्ट्रिक स्कूटरला 8.5kW चा बॅटरी पॅक मिळतो जो 181 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याचा टॉप स्पीड 116 किमी/तास आहे. ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 40 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते.
वैशिष्ट्ये काय आहेत?
ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स सारखे राइडिंग मोड उपलब्ध आहेत. इको मोडवर 125 किमी, नॉर्मल मोडवर 100 किमी आणि स्पोर्ट्स मोडवर 90 किमीची रेंज देते. याबरोबरच अनेक अपडेटेड फीचर्सही यामध्ये उपलब्ध आहेत.
TVS iCube शी स्पर्धा करणार
ओला एस वन टीव्हीएस आयक्यूबशी स्पर्धा करते. याला 4.4kW इलेक्ट्रिक हब मोटर मिळते, जी 3kW पॉवर आणि 140Nm पीक टॉर्क निर्माण करते. त्याचा टॉप स्पीड 78 किमी प्रतितास आहे.
महत्त्वाच्या बातम्या :