MG Hector : एमजीची नेक्स्ट-जनरेशन हेक्टर 14.72 लाखांपासून बाजारात उपलब्ध; 'हे' आहे खास वैशिष्ट्य
MG Hector : नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अनेक अपडेटेड टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे.
MG Hector : एमजी मोटर इंडिया कंपनीने नुकतीच आगामी एमजी नेक्स्ट-जनरेशन हेक्टरची (MG Hector) घोषणा केली आहे. ही नेक्स्ट-जनरेशन हेक्टर 14.72 लाखांपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. स्टाइल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सेवी प्रो या 5 व्हेरिएंट्समध्ये हेक्टर येणार आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अनेक अपडेटेड टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. 11 ऑटोनॉमस लेव्हल 2 (एडीएएस) वैशिष्ट्ये आहेत, जी ड्रायव्हिंगसाठी अत्यंत युरक्षित आणि आरामदायी आहेत.
इंटिरीयर कसे आहेत?
नवीन एसयूव्हीचे लक्षवेधक इंटीरिअर्स ड्युअल-ओन अर्जाइल ब्राऊन आणि ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. प्रमुख एसयूव्ही 5, 6 आणि 7-सीटर कन्फिग्युरेशन्समध्ये उपलब्ध आहे. 6-आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये येतात, तर 7-आसनी वेईकलमध्ये बेंच सीट्स आहेत.
नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेटर्स देखील विनासायास आणि सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देतात. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडीकेटर लाइट आपोआपपणे ऑन/ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडीकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.
तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये 75 हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह 100 वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय क्रांतिकारी आय-स्मार्ट तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर व आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टीव्हीटी, सर्विसेस आणि अॅप्लीकेशन्स आहेत.
आय-स्मार्ट तंत्रज्ञानासह समाविष्ट करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरच्या वॉईस कमांड्समध्ये सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये आहेत. जसे, सनरूफसाठी टच-स्क्रिन कंट्रोल, अॅम्बियण्ट लाइट्ससाठी वॉईस कमांड्स, पाच भारतीय भाषांमध्ये नेव्हिगेशन वॉईस मार्गदर्शन, 50 हून अधिक हिंग्लिश कमांड्स आणि इतर उपयुक्त अॅप्स जसे पार्किंग शोधण्यासाठी व बुक करण्यासाठी पार्क+ आणि म्युझिकसाठी जिओ-सावन अॅप. इन्फिनिटीद्वारे प्रिमिअम ऑडिओ सिस्टम वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्लेसह येते आणि सर्वोत्तम, सर्वांगीण संपन्न साऊंड देते.
नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे 6 एअरबॅग्स, 360-डिग्री एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांसाठी 3-पॉइण्ट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ईपीबी) आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स.
महत्त्वाच्या बातम्या :
Auto Expo 2023 : टाटा मोटर्सची Tiago EV Blitz सादर; रेग्युलर मॉडेलपेक्षा फार वेगळी आहे ही कार