(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maruti Suzuki Jimny 5-door : ग्रँड विटारा आणि थार सोबत दिसली नवीन जिम्नी, 2023 ऑटो एक्सपोमध्ये होणार लॉन्च
Maruti Suzuki Jimny: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी लवकरच आपली जबरदस्त कार जिम्नी भारतात लॉन्च करणार आहे. ही कार अनेकवेळा टेस्टिंग दरम्यान दिसली आहे.
Maruti Suzuki Jimny: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी लवकरच आपली जबरदस्त कार जिम्नी भारतात लॉन्च करणार आहे. ही कार अनेकवेळा टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. अलीकडेच टेस्टिंग दरम्यान ही कार लेहमध्ये ग्रँड विटारा आणि महिंद्रा थारसह दिसली. मारुतीची ही अपडेटेड कार लॉन्च झाल्यानंतर भारतात याची स्पर्धा महिंद्रा थारशी होणार आहे. कंपनी या कारची ऑफ-रोड टेस्टिंग करत आहे. तसेच खडतर रस्त्यांवर ही कार कशी धावते हे देखील पाहत आहे.
4x4 प्रणाली असलेली मारुतीची पहिली कार
ग्रँड विटारा ही मारुतीची पहिली ऑल व्हील ड्राईव्ह कार आहे. परंतु जिम्नी 5-डोर (Maruti Suzuki Jimny 5-door) ही थारसारखी 4x4 सिस्टिम मिळवणारी पहिली मारुती कार असेल. याव्यतिरिक्त, यात लो-रेंजसह ऑफ-रोड मोड देखील मिळेल. 5-डोअर व्हेरिएंट याच्या 3-डोअर व्हेरिएंटशी मिळतेजुळतेच आहे. यात लॉन्ग रेंजसाठी नवीन बॉडी पॅनेल्स आणि नवीन डोअर डिझाइन तसेच लांब व्हीलबेस आवश्यक आहे. 5-डोअर जिम्नी केवळ 4x4 सिस्टिमसह उपलब्ध असेल. तसेच ही कार मॅन्युअल आणि स्वयंचलित दोन्ही पर्यायांमध्ये लॉन्च केली जाईल.
इंजिन
नवीन जिम्नीमध्ये (Maruti Suzuki Jimny) कंपनीने पॅडल शिफ्टर्ससह नवीन 1.5 L पेट्रोल इंजिन दिले आहे. यात ग्राहकांना 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. हे एक माईल्ड हायब्रिड इंजिन असेल, जे फुल हायब्रीडसह ग्रँड विटारामध्ये आधीच देण्यात आले आहे. नवीन जिम्नीमध्ये कंपनीने 360-डिग्री कॅमेरा, हेड्स-अप डिस्प्ले, ऑफ-रोड स्पेशल डिस्प्ले आणि टचस्क्रीनसह 3-डोअर ग्लोबल मॉडेलपेक्षा खूप चांगले फीचर्स दिले आहेत. असे असले तरी नवीन जिम्नी सनरूफसह येणार नाही. कारण हे फीचर Brezza आणि Grand Vitara मध्ये उपलब्ध आहे.
कधी होणार लॉन्च? (Maruti Suzuki Jimny Launch)
नवीन जिम्नी ऑटो एक्सपो 2023 मध्ये (2023 Auto Expo) लॉन्च केली जाऊ शकते. येथे प्रीमियम SUV ग्रँड विटारा सोबत Nexa शोरूममधून विकली जाईल. 5-डोअर जिम्नीला जिप्सीची उत्तराधिकारी म्हणता येईल. ही कार भारतात एक प्रतिष्ठित मॉडेल म्हणून पाहिली जात होती. पण जिप्सीच्या विपरीत, जिम्नी 5-डोअरसह येईल. जे कौटुंबिक एसयूव्ही म्हणून देखील योग्य आहे. मारुती जिम्नी 5-डोअरची किंमत थारच्या 4x4 मानकांच्या जवळपास असावी, अशी आमची अपेक्षा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार