Maruti Suzuki Invicto Launched : मारुती सुझुकीची सर्वात महागडी MPV Invicto कार भारतात लॉन्च; किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत 'ही' वैशिष्ट्य आहेत खास
Maruti Suzuki Invicto : मारूती सुझुकीच्या या कारची स्पर्धा Kia Carnival आणि Toyota Innova Crysta सारख्या कारबरोबर केली जाणार आहे.
Maruti Suzuki Invicto : मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित MPV कार Maruti Suzuki Invicto लाँच केली आहे. ही कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे. अत्यंत आरामदायी, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम असणाऱ्या या कारची स्पर्धा किया कार्निव्हल आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा सारख्या कारबरोबर केली जाणार आहे.
मारुती सुझुकी इनव्हिक्टो डिझाईन
मारुतीची ही कार डिझाईनच्या बाबतीत टोयोटा इनोव्हा हायक्रॉससारखीच आहे. मात्र, मारुती सुझुकीने आपल्या बंपरमध्ये काही बदल केले आहेत.
मारुती सुझुकी इनव्हिक्टो केबिनची वैशिष्ट्ये
Maruti Suzuki Invicto च्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास, हे ऑल ब्लॅक थीमसह सादर केले गेले आहे. या कारमध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि त्याची मधली सीट पॉवर ऑट्टोमन वैशिष्ट्यासह सादर केली गेली आहे. कंपनीने ते Chimpanzee Gold Accent सह सादर केले आहे, ज्यामध्ये लेदर सीट्स तसेच सॉफ्ट टच प्रीमियम इन्स्ट्रुमेंट पॅनल, अॅम्बियंट लाइटिंगसह पॅनोरॅमिक सनरूफ आहेत. इतर वैशिष्ट्यांबाबतीत बोलायचे झाल्यास, 7-8 सीट कॉन्फिगरेशन, मेमरीसह 8 वे पॉवर ड्रायव्हर सीट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन एसी, रिअर डोअर सनशेड्स, IR कट विंडशील्ड, पॉवर्ड टेलगेट, 360 डिग्री मॉनिटरसह सनशेड्सचा समावेश आहे.
मारुती सुझुकी इनव्हिक्टो सुरक्षा वैशिष्ट्ये
Maruti Suzuki Invicto या एमपीव्हीमध्ये कारच्या सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीने पुरेपूर काळजी घेतली आहे. यामध्ये स्टँडर्ड फीचर्स म्हणून 6 एअरबॅग्ज, फ्रंट-रिअर डिस्क ब्रेक, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एबीएससह एबीएस, हिल होल्ड असिस्टसह वाहन स्थिरता नियंत्रण वैशिष्ट्य, 3 पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि 360 डिग्री व्ह्यूचा समावेश आहे. कॅमेरा, एअर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फिचर्स दिले आहेत.
मारुती सुझुकी इनव्हिक्टो पॉवरट्रेन
मारुतीने ही एमपीव्ही हायब्रिड पॉवरट्रेनसह सादर केली आहे. ज्याचे इंजिन 6000 rpm वर 112 kWh चा पॉवर आणि 4400 rpm वर 188Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये उपस्थित असलेली इलेक्ट्रिक मोटर 4000 rpm वर 83.73 kW ची पॉवर आणि 206 Nm टॉर्क जनरेट करते. हे या कारला एकूण 137 kW चे आउटपुट देण्यास सक्षम आहेत. कंपनीने या MPV साठी 23.24 km/l मायलेजचा दावा केला आहे. तसेच इंधन टाकीची क्षमता 52 लीटर आहे.
मारुती सुझुकी इनव्हिक्टो किंमत
कंपनीने ही MPV तीन व्हेरिएंटसह सादर केली आहे (Zeta + 7 सीटर, Zeta + 8 सीटर आणि Alpha +). किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Zeta+ 7 सीटरची किंमत 24.79 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. Zeta+ 8 सीटरची किंमत 24.84 लाख रुपये एक्स-शोरूम आहे आणि Alpha+ ची एक्स-शोरूम किंमत 28.42 लाख रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
2023 Kia Seltos facelift पूर्वीपेक्षा किती पॉवरफुल आहे? नवीन अपडेट कोणते? वाचा A to Z माहिती